no images were found
स्पर्धा परिक्षार्थींनी ग्रंथालय सदृश्य अभ्यासिकेचा लाभ घ्यावा – संजय माळी
कोल्हापूर:जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत “ग्रंथालय सदृश्य अभ्यासिका” ही योजना राबविली जाते. या अभ्यासिकेमध्ये एमपीएससी,युपीएससी व इतर स्पर्धा परीक्षेसाठी विविध प्रकारची पुस्तके वाचनासाठी मोफत उपलब्ध आहेत. उमेदवारांनी अभ्यासिकेसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सी बिल्डींग, शासकीय निवासस्थान, विचारे माळ,कोल्हापूर, दूरध्वनी 0231
2545677 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. इच्छुक, गरजू पदवीधर उमेदवारांनी ग्रंथालय सदृश्य अभ्यासिकेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.