Home शैक्षणिक कळंबा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशासाठी अर्ज सादर करावेत

कळंबा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशासाठी अर्ज सादर करावेत

15 second read
0
0
34

no images were found

कळंबा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशासाठी अर्ज सादर करावेत

कोल्हापूर : शासकीय आयटीआय कळंबा येथे प्रवेश सत्र 2024 साठी एकूण 31 व्यवसायांकरीता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक जाहीर झाले असून ऑनलाईन प्रवेश अर्ज 30 जून 2024 पर्यंत सादर करण्याबाबत कार्यवाही सुरु झाली आहे. प्रवेश अर्ज ऑनलाईन ITIAdmission Portal: http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर भरावेत. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरल्यानंतर माहिती बरोबर असल्याची खात्री करुन त्यानंतर प्रवेशअर्ज शुल्क ऑनलाईन पेमेंट गेटवेच्या माध्यमातून जमा करावे, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे.

प्रवेश शुल्क मागासवर्गीय उमेदवारांना 100 रुपये व खुल्या गटातील उमेदवारांना 150 रुपये निश्चित करण्यात आले आहे. प्रवेश अर्ज शुल्क भरल्यानंतर अर्जातील माहिती गोठविण्यात येईल व त्यानंतर या माहितीमध्ये कोणताही बदल करता येणार नाही. प्रवेश अर्ज भरलेल्या उमेदवारांनी पुढील सर्व ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी त्यांचा पासवर्ड जतन करुन ठेवणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी एकूण सहा प्रवेश फे-या होतील. शासकीय आयटीआय कोल्हापूर येथे प्रवेशासाठी मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचा सर्व उमेदवारांनी लाभ घेवून प्रवेशासाठी व्यवसाय विकल्प सादर करावा.

 संस्थेत एकूण 31 व्यवसाय आहेत. एक वर्ष मुदतीचे एकूण 15 व्यवसाय असून दोन वर्ष मुदतीचे एकूण 16 व्यवसाय आहेत. चालू वर्षी दोन्ही मिळून एकूण 1 हजार 340 जागा भरल्या जातील. प्रवेशासाठी महिलांना, मुलींना सर्व व्यवसायांत 30 टक्के आरक्षण असून मुलींसाठी बेसिक कॉस्मोटोलॉजी, सुईंग टेक्नॉलॉजी, फळभाज्या टिकवणे इ. स्वतंत्र व्यवसाय अभ्यासक्रम आहेत. प्रवेशासाठी एकच अर्ज भरणे आवश्यक आहे. दुबार अर्ज केल्यास उमेदवार प्रवेश प्रक्रियेमध्ये अपात्र ठरला जाईल. निवड झालेल्या उमेदवारांकडे सर्व मुळ प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे अन्यथा प्रवेश नाकारला जाईल. संस्थेत 450 प्रशिक्षणार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृहाची सोय उपलब्ध असून, शासकीय नियमाप्रमाणे एसटी, बस पास, रेल्वे पास सवलत तसेच विद्यावेतन दिले जाते.

जिल्ह्यातील उमेदवारांसाठी 90 टक्के तर जिल्ह्याबाहेरील उमेदवारांसाठी 10 टक्के जागा राखीव ठेवलेल्या असल्यामुळे या प्रवेश सत्रामध्ये जिल्ह्यातील अधिकाधिक उमेदवारांना प्रवेशासाठी जास्तीच्या जागा उपलब्ध झाल्या आहेत. संस्थेमध्ये एक वर्ष मुदतीचे व दोन वर्ष मुदतीचे खालील व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.-

एक वर्ष मुदतीचे अभ्यासक्रम-  बेसिक कॉस्मॉलॉजी, सुतारकाम, कॉम्प्युटर ॲप अॅण्ड प्रोग्रॅमिंग असि., फौंड्रीमन, फ्रुट व्हेजीटेबल अॅण्ड प्रोसेंसिग, मेसन (बिल्डींग कन्स्ट्रक्शन), यां. डिझेल, या. कृर्षित्र, प्लॅस्टीक प्रोसे. ऑपरेटर, नळ कारागीर, सुईंग टेक्नॉलॉजी, पत्रेकारागिर, स्टेनोग्राफी इं., सरफेस ऑर्नामेंटस व संधाता इ.

दोन वर्ष मुदतीचे अभ्यासक्रम- आरेखक स्थापत्य,आरेखक यांत्रिकी, वीजतंत्री, जोडारी, आयसीटीएसएम, यंत्रकारागिर, यंत्रकारागिर घर्षक, यां.कृषी व यंत्रसामुग्री, मेक मशिन टूल मेन्टनन्स, यांत्रिक मोटारगाडी, यां. प्रशितन व वातानुलीकरण, रंगारी जनरल, टूल ॲण्ड डाय मेकर, कातारी, तारतंत्री व विजविलेपक इ.

प्रवेशाबाबतचे सविस्तर वेळापत्रक ITIAdmission Portal: http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी त्याप्रमाणे कार्यवाही करावी. वेळापत्रकात काही बदल झाल्यास नोंदणीकृत उमेदवारांना एसएमएसव्दारे कळविण्यात येईल.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोण होतीस तू, काय झालीस तू! मालिकेसाठी अभिनेत्री गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचं प्रशिक्षण

कोण होतीस तू, काय झालीस तू! मालिकेसाठी अभिनेत्री गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचं प्रशिक्षण &…