Home शासकीय जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत

जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत

17 second read
0
0
35

no images were found

जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत

 

        कोल्हापूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने सन 2018-19, 2019-20, 2020-21, 2021-22, 2022-23 व 2023-24 पर्यंतचे जिल्हास्तरीय युवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, खासबाग मैदान जवळ, छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे कार्यालयीन वेळेत मिळेल. यासाठी दि. 1 जुलै 2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज स्वीकारण्यात येतील. त्यानुसार वयाची अट पाहून कोल्हापूर जिल्ह्यातील युवक, युवतींनी आपला प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी केले आहे.

जिल्हा युवा पुरस्कार स्वरुप –  जिल्हा स्तरावर एक युवक तसेच एक युवती, एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येईल. प्रति युवक व युवतीसाठी हा पुरस्कार गौरवपत्र सन्मानचिन्ह, रोख रक्कम दहा हजार. प्रति संस्थेमाठी गौरवपत्र सन्मान चिन्ह, रोख रक्कम पन्नास हजार अशा स्वरुपाचा असेल.

पात्रतेचे निकष (युवक व युवतींसाठी )- अर्जदार युवक, युवतीचे वय पुरस्कार वर्षातील 1 एप्रिल रोजी 13 वर्षे पूर्ण व 31 मार्च रोजी 35 वर्षे पर्यंत असावे. जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करणा-या अर्जदाराचे त्या जिल्ह्यात सलग 5 वर्ष वास्तव्य तर राज्यस्तर पुरास्कारासाठी राज्यात 10 वर्षे वास्तव्य असणे आवश्यक आहे. पुरस्कार व्यक्ती अथवा संस्थेस विभागून दिला जाणार नाही. पुरस्कार मरणोत्तर जाहीर करण्यात येणार नाही. केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. (उदा. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती व फोटो इ.)  अर्जदार युवक व युवतीने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्ष क्रियाशिल कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक आहे. अर्जदार व्यक्तीचे कार्य हे स्वयंस्फुर्तीने केलेले असावे. एका जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक,कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.

 संस्थांसाठी पात्रता निकष-पुरस्कार संस्थेस विभागून दिला जाणार नाही. संस्थांनी केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. (उदा. वृत्तपत्रीय कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती व फोटो) अर्जदार संस्थेने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्ष क्रियाशील कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक आहे. अर्जदार संस्था सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियम 1860 किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट अॅक्ट 1950 नुसार पंजीबध्द असावी. अर्जदार संस्था नोंदणी झाल्यानंतर किमान पाच वर्षे कार्यरत असणे आवश्यक आहे. अर्जदार संस्थांचे कार्य हे स्वयंस्फूर्तीन केलेले असावे. एका जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त करणारी संस्था राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. अर्जदार,  संस्थेच्या सदस्यांचा पोलिस विभागाने प्रमाणित केलेला चारित्र्य दाखला (संबंधित परिक्षेत्रातील पोलिस स्टेशन) देणे आवश्यक राहील.

पुरस्कारासाठी मुल्यांकन- युवा व युवा विकासाचे कार्य करणा-या संस्थांनी केलेले कार्य दि.1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीतील गत तीन वर्षांची कलेली कार्य, कामगिरी विचारात घेण्यात येईल. युवा अथवा नोंदणीकृत संस्थांनी ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य. राज्याची साधन, संपत्ती जतन व संवर्धन तसेच राष्ट्र उभारणीच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे कार्य. समाजातील दुर्बल घटक, अनुसुचीत जाती, जमाती व जनजाती आदिवासी भाग इ. बाबतचे कार्य. शिक्षण, प्रौढ शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक, कला, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवसाय, महिला सक्षमीकरण, स्त्रीभ्रूण, व्यसनमुक्ती तसेच युवांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य. राष्ट्रीय एकात्मतेम प्रोत्साहन देणारे कार्य, नागरी गलिच्छ वस्ती सुधारणा, झोपडपट्टी, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक समस्या, महिला सक्षमीकरण इ. बाबत कार्य, साहस इ. बाबतचे कार्य केलेले असावे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवछत्रपती पुरस्कार सोहळा ऐतिहासिक असेल- क्रीडामंत्री भरणे

शिवछत्रपती पुरस्कार सोहळा ऐतिहासिक असेल- क्रीडामंत्री भरणे   पुणे : अनेक वर्षांनंतर स…