Home शासकीय जातीच्या दाखल्या अभावी प्रलंबित प्रकरणे मार्गी लावा -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

जातीच्या दाखल्या अभावी प्रलंबित प्रकरणे मार्गी लावा -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

10 second read
0
0
42

no images were found

जातीच्या दाखल्या अभावी प्रलंबित प्रकरणे मार्गी लावा -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : अनुसूचित जाती जमातीच्या जातीच्या दाखल्या अभावी प्रलंबित प्रकरणी दक्षता समिती सदस्यांनी पीडितांच्या घरोघरी भेट देऊन आवश्यक कागदपत्रे मिळवून प्रकरणे मार्गी लावावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या. जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात घेण्यात आली. बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे तसेच समिती सदस्य उपस्थित होते.
           जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीकडे प्राप्त प्रकरणी आवश्यक कागदपत्रे त्या त्या विभागांकडून प्राप्त करवून घेवून प्रकरणांचा निपटारा करा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या. अनुसूचित जाती, जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम अंतर्गत पोलीस तपासावरील प्रलंबित प्रकरणे, या अधिनियमांतर्गत दाखल झालेल्या परंतु कागदपत्रांअभावी अर्थसहाय्य देण्यास प्रलंबित व अर्थसहाय्य अदा करण्यासाठी प्राप्त प्रकरणे आणि न्यायालयात दाखल असणाऱ्या प्रकरणांचा आढावा जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी बैठकीत घेतला. हाताने मैला उचलणाऱ्या सफाईगारांच्या नियुक्तीला प्रतिबंध व त्यांचे पुनर्वसन अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करा हाताने मैला उचलणाऱ्या सफाईगारांच्या नियुक्तीला प्रतिबंध व त्यांचे पुनर्वसन अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.
             हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन अधिनियम 2013 अंमलबजावणीबाबत श्री. रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली, यावेळी त्यांनी या सूचना केल्या. शासकीय व निम शासकीय कार्यालयातील हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांची संख्या, शासकीय, निम शासकीय कार्यालयातील सफाई कामगारांना काम करताना पुरवावयाच्या सोयी-सुविधा, उपकरणे आदी बाबींचा आढावा घेऊन सफाई कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी केल्या. दरम्यान नव्याने संघटित झालेल्या या दोन्ही समितीच्या नवनियुक्त अशासकीय सदस्यांचे समाज कल्याण विभागाच्या वतीने यावेळी स्वागत करण्यात आले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…