Home मनोरंजन आनंदी मालिकेत धमाकेदार वळण सुप्रसिद्ध अभिनेत्री मुग्धा शहा यांची एण्ट्री

आनंदी मालिकेत धमाकेदार वळण सुप्रसिद्ध अभिनेत्री मुग्धा शहा यांची एण्ट्री

2 second read
0
0
9

no images were found

आनंदी मालिकेत धमाकेदार वळण सुप्रसिद्ध अभिनेत्री मुग्धा शहा यांची एण्ट्री

स्टार प्रवाहच्या आनंदी मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. अनेक नाट्यमय घडामोडींनंतर आनंदी आणि युगंधर यांचं लग्न पार पडलं मात्र आनंदीचा सासरी सून म्हणून गृहप्रवेश झाला नाही. आता तर आनंदीच्या आयुष्यात शिल्पा निंबाळकर नावाचं वादळ येणार आहे.

सुप्रसिद्ध अभिनेत्री मुग्धा शहा शिल्पा निंबाळकर हे पात्र साकारत आहेत. दुर्वा मालिकेनंतर जवळपास १३ वर्षांनंतर त्या स्टार प्रवाहसोबत काम करत आहेत. या भूमिकेविषयी सांगताना त्या म्हणाल्या, ‘मी ३५ वर्ष अभिनय क्षेत्रात काम करतेय. या काळात जवळपास ८० टक्के भूमिका मी खलनायिकेच्या साकारल्या आहेत. या मालिकेतल्या शिल्पाचा निंबाळकर कुटुंबात दरारा आहे. शिल्पा ही युगंधरची मोठी बहीण. तिने प्रेमासाठी एका गरीब मुलाशी लग्न केलं. पण लग्नानंतर मूल होत नसल्यामुळे तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिलं. त्या वेदनादायक अनुभवामुळे तिच्या मनात गरीब लोकांविषयी तीव्र द्वेष आणि अविश्वास निर्माण झाला. तिचा असा विश्वास आहे की गरीब लोक अनेकदा पैशासाठी इतरांचा फायदा घेतात आणि त्यांच्यावर सहज विश्वास ठेवता येत नाही. पण दुसऱ्या बाजूला, युगंधरवरील तिचं प्रेम मात्र निरपेक्ष आहे. आपल्या भावासाठी ती स्वतःचा जीवही देऊ शकते. जेव्हा शिल्पाला युगंधर आणि आनंदीच्या लग्नाबद्दल कळेत तेव्हा मात्र नवं नाट्य रंगणार यात शंका नाही. तेव्हा नक्की पाहा आनंदी दररोज रात्री ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर. 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

गांधीनगर येथे तंबाखूविरोधी धडक मोहीम ; २७ जणांवर कारवाई ५४०० रुपये दंड वसूल

गांधीनगर येथे तंबाखूविरोधी धडक मोहीम ; २७ जणांवर कारवाई ५४०० रुपये दंड वसूल कोल्हापूर,&nbs…