Home Uncategorized गांधीनगर येथे तंबाखूविरोधी धडक मोहीम ; २७ जणांवर कारवाई ५४०० रुपये दंड वसूल

गांधीनगर येथे तंबाखूविरोधी धडक मोहीम ; २७ जणांवर कारवाई ५४०० रुपये दंड वसूल

41 second read
0
0
9

no images were found

गांधीनगर येथे तंबाखूविरोधी धडक मोहीम ; २७ जणांवर कारवाई ५४०० रुपये दंड वसूल

कोल्हापूर,  : आगामी ३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सीपीआर रुग्णालय कोल्हापूर, अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने गांधीनगर परिसरात तंबाखूविरोधी विशेष धडक कारवाई मोहीम राबविण्यात आली.

जिल्हा शल्य चिकित्सक (प्र) डॉ. सरिता थोरात, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ.रेश्मा पाटील, वसाहत रुग्णालय गांधीनगरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिलीप वाडकर तसेच गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सल्लागार (NTCP) डॉ. व्ही. ए. आरळेकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

         या पथकाने गांधीनगर परिसरातील वसाहत रुग्णालय,पोलीस स्टेशन,शाळा परिसर,बाजारपेठ तसेच पानटपऱ्यांची तपासणी करून Cigarettes and Other Tobacco Products Act (COTPA) 2003 अंतर्गत नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केली. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे,तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे तसेच कोटपा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या एकूण २७ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून सुमारे ५ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

          यावेळी कारवाईदरम्यान संबंधित नागरिक, विक्रेते व तरुणांना तंबाखू सेवनामुळे होणारे गंभीर आरोग्य दुष्परिणाम, कर्करोगासारखे जीवघेणे आजार तसेच तंबाखू नियंत्रण कायद्याचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. 

     तरुणामधील वाढती व्यसनाधीनता चिंतेची बाब असल्याने आगामी काळात ही अशा प्रकारच्या संयुक्त मोहिमा अधिक व्यापक व प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे डॉ व्ही ए . आरळेकर त्यांनी सांगितले.सदर कारवाईत अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी श्री. आर.पी.पाटील,डॉ तेजस्वी पवार, श्रीमती चारुशीला कणसे , क्रांती शिंदे,मंगल चव्हाण, क्लरा चोपडे व गांधीनगर पोलीस ठाण्याचे पी. एन. खाडे यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला.

                            

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

आनंदी मालिकेत धमाकेदार वळण सुप्रसिद्ध अभिनेत्री मुग्धा शहा यांची एण्ट्री

आनंदी मालिकेत धमाकेदार वळण सुप्रसिद्ध अभिनेत्री मुग्धा शहा यांची एण्ट्री स्टार प्रवाहच्या …