Home राजकीय ‘मित्र’ आणि बायसॅग-एन करारामुळे महाराष्ट्राच्या तंत्रज्ञानाधिष्ठित विकासाला चालना : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘मित्र’ आणि बायसॅग-एन करारामुळे महाराष्ट्राच्या तंत्रज्ञानाधिष्ठित विकासाला चालना : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

18 second read
0
0
11

no images were found

‘मित्र’ आणि बायसॅग-एन करारामुळे महाराष्ट्राच्या तंत्रज्ञानाधिष्ठित विकासाला चालना : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई,  : राज्यातील पायाभूत सुविधा विकास, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि पर्यावरण व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी ‘मित्र’ आणि बायसॅग-एन यांच्यात झालेला सामंजस्य करार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्राच्या सर्वांगीण आणि तंत्रज्ञानाधिष्ठित विकासाला चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

वर्षा निवासस्थान येथे मित्र (Maharashtra Institution for Transformation) आणि बायसॅग-एन (Bhaskaracharya National Institute for Space Applications and Geo-informatics) यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. *याप्रसंगी माजी सहकार मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील, मित्र संस्थेचे उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, मित्र – महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन) चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, बायसॅग-एन महासंचालक डॉ. टी. पी. सिंह, मित्र चे वरिष्ठ सल्लागार डॉ. विराज लोलियाना, संशोधन अधिकारी सुमीरन बलसेकर, दिपंकर होवाळ, संकेत निंबाळकर, प्राजक्ता माळी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.*

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोणताही प्रकल्प राबविला जात असताना माहितीचे विश्लेषण, माहितीची उपलब्धता आणि ही माहिती वस्तुनिष्ठ स्वरूपात असणे आवश्यक आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक वैशिष्ट्यांसह, भौगोलिक, ऐतिहासिक वैशिष्ट्ये एकत्र केली जाणार आहेत. भू-स्थानिक माहितीचे व्यवस्थापन व विश्लेषण करण्यासाठी विविध स्रोतांमधून आणि विविध स्वरूपांतील माहिती संकलित करून तिचे सखोल विश्लेषण व निरीक्षण केले जाणार आहे. या माहितीच्या आधारे शासकीय योजना, विविध प्रकल्प आणि कार्यक्रमांचे संनियंत्रण, मूल्यमापन व अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करता येईल. यामुळे लाभार्यांची निवड अधिक अचूक पद्धतीने करता येणे शक्य होणार आहे. तसेच वस्तुनिष्ठ व सखोल विश्लेषणाच्या माध्यमातून सामाजिक-आर्थिक समतोल राखत शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास मदत होईल.

*चौकट :*

*कराराची वैशिष्ट्ये :*
या सामंजस्य कराराअंतर्गत उपग्रहाद्वारे संकलित केली जाणारी माहिती या माहितीचे विश्लेषण याचा आधार घेवून भू- स्थानिक वैशिष्ठ्यांच्या आधारे प्रकल्पाची आखणी, संचलन आणि अंमलबजावणी केली जाणार आहे.भू-स्थानिक क्षेत्रात धोरणे व मानक कार्यपद्धती विकसित करण्यासाठी तांत्रिक सहाय्य करणे.

या माध्यमातून प्राप्त झालेली माहिती प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून भू-स्थानिक तंत्रज्ञान, दूरसंवेदी तंत्रज्ञान, उपग्रह संप्रेषण, जिओ-इन्फॉर्मेटिक्स आणि डेटा अ‍ॅनालिटिक्स प्लॅटफॉर्म्स या सारख्या सोफ्टवेअर प्रणालींचा वापर करून अधिक परिणामकारकरित्या शासकीय योजना व प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी सुनिश्चित केला जाणार आहे. तसेच या माध्यमातून गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

बिग डेटा मॅपिंग, प्रगत फोटोग्रामेट्री, डिफरेंशियल जीपीएस आणि विषयनिहाय भू-स्थानिक मॉडेलिंगचा वापर करून अचूक नकाशांकन व स्थानिक विश्लेषण करणे.

प्रकल्पांच्या गरजेनुसार सॉफ्टवेअर प्रणालींचा विकास व सानुकूलन करण्यात येईल. यामध्ये उंची नमुना, पृष्ठभाग नमुना, अचूक ऑर्थो-फोटो निर्मिती आणि प्रगत कार्टोग्राफीचा समावेश

बहुवर्णीय उपग्रह प्रतिमांच्या प्रक्रियेद्वारे प्राप्त माहितीचा उपयोग करून प्रकल्पांचे नियोजन, रचना आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी व्यापक डेटा उपलब्ध करून देणे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सु…