
no images were found
शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी 31 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज भरावेत
कोल्हापूर : भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसुचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाचे शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी दि. 22 सप्टेंबर 2022 पासून सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. सद्यस्थितीमध्ये बराच कालावधी उलटून गेला असला, तरीही जिल्ह्यातील महाविद्यालयामध्ये शिकत असणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अत्यंत कमी प्रमाणात अर्ज नोंदणी केली आहे. त्यामुळे अनुसुचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज 31 मे 2023 पर्यंत ऑनलाईन भरावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असणाऱ्या अर्जांची पडताळणी करुन सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे पाठवावेत. महाविद्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या समान संधी केंद्रामार्फंत सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज भरावेत, असेही श्री. लोंढे यांनी कळविले आहे