
no images were found
विविध धाटणीच्या बंदीशीमुळे रागाचे सौंदर्य खुलते- वंदना आठले
दिनांक २९ व ३० मे 2023 रोजी संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठातर्फे दोन दिवसीय शास्त्रीय गायन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी प्रसिध्द शास्त्रीय गायिका व गुरू सौ.वंदना आठले यांनी मार्गदर्शन केले. त्याच बरोबर या कार्यशाळेसाठी सहमार्गदर्शिका म्हणून प्रसिद्ध युवा गायिका सौ.चिन्मयी आठले-ओक याही उपस्थित होत्या. कार्यशाळेचे प्रास्ताविक अधिविभागतील प्राध्यापक डॉ.विनोद ठाकुरदेसाई यांनी केले तर पाहुण्यांची ओळख श्री.अतुल परीट यांनी करून दिली. पाहुण्यांचे स्वागत संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ.अंजली
निगवेकर यांनी केले. कार्यशाळेच्या शेवटी डॉ.निखिल भगत यांनी आभार मानले. या कार्यशाळेमध्ये अहिर भैरव, गावती, हंसध्वनी, बिहाग आदी रागातील विविध बंदिशी, त्यांची गायकी, आकृत्यांची उकल, मुखड्यांचे सौंदर्य, बंदीशीच्या अंगाने रागाची मांडणी, रियाजाच्या पद्धती यांवर सौ.वंदना आठले व सौ.चिन्मयी आठले-ओक यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले..या कार्यशाळेसाठी अधिविभागतील प्राध्यापक श्री. प्रशांत देसाई यांनी
तबल्याची साथ केली. या कार्यशाळेला अधिविभागतील विद्यार्थी, जिज्ञासू, रसिक तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते