
no images were found
डीकेटीई सिव्हील इंजिनिअरींगच्या तब्बल १७ विद्यार्थ्यांची ‘रोहन बिल्डर्स’ कंपनीत निवड
इचलकरंजी (प्रतिनिधी) – येथील डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागाच्या तब्बल १७ विद्यार्थ्यांची ‘रोहन बिल्डर्स’ कंपनीत निवड झाली आहे. सध्या इंजिनिअरींग क्षेत्रात जोरदार स्पर्धा असल्या कारणाने सिव्हील इंजिनिअरींगचे हे यश मोठे मानले जाते आहे. डीकेटीईच्या सिव्हील विभागातील माजी विद्यार्थी व इंडस्ट्री यांचे चांगले हितसंबध असल्यामुळे डीकेटीईच्या सिव्हील विभागातील प्लेसमेंट हे शंभर टक्के होत आहेत.
‘रोहन बिल्डर्स’ ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेली रिअल इस्टेट मधील अग्रगण्य कंपनी आहे. रोहन बिल्डर्सच्या माध्यमातून अनेक आयटी पार्कस, ऑफीस कॉम्पलेक्स विकसीत झाले आहेत. या कंपनीचे प्रोजेक्टस विचारपूरर्वक डिझाईन, आधुनिक सुविधा आणि तपशिलांकडे लक्ष देण्यासाठी ओळखले जातात.
सध्याच्या परिस्थितीमध्ये उद्योगविश्वाला आंतरविद्याशाखीय (Interdisciplinary) प्रकल्पांवर काम करु शकतील अशा अभियंत्यांची गरज आहे. त्या अनुशंगाने व उद्योगविश्वाची गरज लक्षात घेवून डीकेटीई मध्ये अशा प्रकारच्या अभ्यासक्रमाचा समावेश केला गेला आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांची विविध कंपन्यामध्ये निवड होण्यास मदत होत आहे.
रोहन बिल्डर्स या कंपनीने डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागात कॅम्पस ड्राईव्ह आयोजित केला होता या कॅम्पस प्लेसमेंट मध्ये सिव्हील विभागातील सतरा विद्यार्थ्यांची उत्तम पॅकेजवरती निवड झाली आहे. निवड झालेले विद्यार्थी – यश सलगरे, तेजस भोकरे, यश सावंत, आर्या जाधव, ज्ञानेश्वर गीरी, सिया कोेल्हापूरे, नाजनीन मोमीन, ॠषिकेश शिरसागर, ओंकार सांगले, रोहित पाटील, प्रितम पाटील, शिवानंद कोणे, उमाकांत कटकधोंड, श्रेयश पाटील, सेजल हिंगमिरे, प्रेमदीप साळवी व स्नेहल यादव.
विद्याथ्यार्ंना संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष व आमदार प्रकाश आवाडे, सचिव डॉ.सौ.सपना आवाडे व सर्व विश्वस्त यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांस संस्थेच्या प्र. संचालिका प्रा. डॉ. सौ. एल. एस. आडमुठे, विभागप्रमुख ए.एल. मुल्ला, टीपीओ प्रा.जी.एस. जोशी, प्रा. व्ही.डी.साखरे व अन्य शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
फोटोओळी- डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागातील रोहन बिल्डर्स या कंपनीमध्ये निवड झालेले विद्यार्थी