Home शासकीय जिल्ह्यातील विविध प्रश्न गतीने मार्गी लावण्याच्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचना

जिल्ह्यातील विविध प्रश्न गतीने मार्गी लावण्याच्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचना

15 second read
0
0
33

no images were found

जिल्ह्यातील विविध प्रश्न गतीने मार्गी लावण्याच्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचना

           

कोल्हापूर ; कोल्हापूर जिल्ह्यातील विविध प्रश्न गतीने मार्गी लावण्याच्या सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिल्या. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात विविध प्रश्नांबाबत आढावा बैठका झाल्या.  

 कागल नगरपालिकेची जागा हस्तांतरित करण्याच्या व कागल शहरातील पाझर तलावाची मोजणी संपादन कागदपत्रे/ मोजणी शीट मिळण्याबाबतही सविस्तर चर्चा झाली.कागल तालुक्यातील करनूर गावातील पुरग्रस्त पुनर्वसनाबाबत त्यांनी आढावा घेतला. पहिल्या टप्प्यात ज्या पूरग्रस्त कुटुंबांची संमती आहे त्यांचे तातडीने पूनर्वसन सुरु करण्याच्या सूचना मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिल्या. महापूरग्रस्तांना द्यावयाच्या खडकेवाडा, हमिदवाडा, चिखली या गावठाण हद्दीमधील प्लॉटबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. आजरा तालुक्यातील आंबेओहोळ प्रकल्पातील उर्वरित पुनर्वसन करण्यासंदर्भात व करपेवाडी वर्ग-२ प्रस्तावासंदर्भात यावेळी त्यांनी आढावा घेतला.

         कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द गावठाण विस्तार करण्यासंदर्भात व लिंगायत समाज स्मशानभुमीला जमिन उपलब्ध करुन देण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिल्या.यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपविभागीय अधिकारी सुशांत बनसोडे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी स्नेहल बर्गे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) एकनाथ काळबांडे, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, नगरपालिका प्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर, कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे, कागल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी, ग्राम विकास अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘आय.आय.एस.सी.’सोबत शिवाजी विद्यापीठ राबविणार संयुक्त संशोधन प्रकल्प

  ‘आय.आय.एस.सी.’सोबत शिवाजी विद्यापीठ राबविणार संयुक्त संशोधन प्रकल्प   कोल्हापू…