no images were found
एनआयटीमध्ये वाचन प्रेरणा दिनानिमित्त व्याख्यान
कोल्हापूर (प्रतिनिधी): श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीमध्ये वाचन प्रेरणा दिनानिमित्त न्यू कॉलेज कोल्हापूरच्या मराठी अधिविभागप्रमुख डॉ. मनीषा नायकवडी यांचे ‘स्वानंदावर बोलू काही’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. एनआयटी संचालक डाॅ. संजय दाभोळे यांनी त्यांचे स्वागत केले. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. कार्यक्रमाची सुरुवात डाॅ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. कोणत्याही वेळी, कोणतेही काम करताना आनंद कसा मिळवायचा याची मार्मिक मांडणी करत डाॅ. नायकवडी यांनी वाचनाचे महत्त्व श्रोत्यांना पटवून दिले. ग्रंथालय समन्वयक प्रा. महेश घोसाळकर यांनी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. प्रस्तावना प्रा. निलम कोन्नूर यांनी तर ग्रंथपाल अनंत गिरीगोसावी यांनी आभार मानले. यावेळी रजिस्ट्रार डाॅ. नितीन पाटील, विभागप्रमुख, ग्रंथालय समन्वयक समिती सदस्य आणि विद्यार्थी व स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते.