विद्यापीठात ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेस उत्साही प्रारंभ कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठस्तरीय ‘आविष्कार २०२२-२३’ या दोन दिवसीय संशोधन स्पर्धेस आज सकाळी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात उत्साहात प्रारंभ झाला. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. गत वर्षी कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर आविष्कार संशोधन स्पर्धा ऑनलाईन स्वरुपात घ्यावी लागली होती. या पार्श्वभूमीवर यंदा पुन्हा ऑफलाईन स्वरुपात …