no images were found
एजेस फेडरल लाईफ इन्शुरन्सच्या वतीने कोल्हापुरात मुलींच्या शाळांकरिता भव्य कला स्पर्धेचे आयोजन
कार्यक्रमात 4900 विद्यार्थिनींचा एकत्रित सहभाग
कोल्हापूर : बालदिनाच्या निमित्ताने एजेस फेडरल लाईफ इन्शुरन्सच्या वतीने कोल्हापुरातील दोन मुलींच्या शाळांकरिता भव्य कला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात उषाराजे हाय स्कूल (ताराराणी विद्यापीठ कोल्हापूर) च्या 2700 आणि राजकुमारी पद्माराजे मुलींची शाळा (एसएम लोहिया कोल्हापूर) च्या 2200 मुली 16 व 17 नोव्हेंबर रोजी सहभागी झाल्या. कार्यक्रम शाळेच्या आवारात रंगला.
या कार्यक्रमात इयत्ता 5 ते 10 व्या इयत्तेतील 10 ते 16 वर्षे वयोगटातील मुली सहभागी झाल्या होत्या. सर्वच वयोगटातील एकूण 78 जणी विजयी ठरल्या, ज्यामध्ये सर्वोच्च 3 विजेत्या आणि सहभागाची बक्षिसे मिळविणारे सहभागी होते.
यावेळी बोलताना एजेस फेडरल लाईफ इन्शुरन्स’चे चीफ मार्केटींग ऑफिसर कार्थिक रामन म्हणाले की, “आम्ही, एजेस फेडरल लाईफ इन्शुरन्समध्ये तरूणांचे मोठी स्वप्नं बघण्यासाठी सक्षमीकरण करते, जेणेकरून ते आपली ध्येय-उद्दिष्ट गाठू शकतील आणि #FutureFearless होतील. स्पर्धेचे ध्येय कोवळ्या वयातील बालकांना अमर्याद शक्यतांनी परिपूर्ण भवितव्याची कल्पना करण्यासाठी मंच उपलब्ध करून देण्याचं तसंच मनातील विचार कला आणि चित्रकलेच्या सर्जनशील माध्यमातून व्यक्त करण्यासाठी उद्युक्त करण्याचं आहे. आम्हाला भविष्यातील झगमगत्या ताऱ्यांना प्रोत्साहन देऊन, त्यांच्या स्वप्नांकरिता पाठबळ निर्माण करण्याचं आहे. जेणेकरून आपल्याला हवी ती ध्येय गाठता येतील हा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण होईल.”