
no images were found
आफताबवर ‘थर्ड डिग्री’ वापरू नका, दिल्ली कोर्टाचे पोलिसांना निर्देश
नवी दिल्ली: श्रद्धा हत्याकांडमधील आरोपी आफताबवर थर्ड डिग्रीचा वापर करू नये, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. आफताब अमीन पूनावाला याच्यावर कोणत्याही थर्ड डिग्री उपायांचा वापर न करण्याचे दिल्ली न्यायालयाने पोलिसांना निर्देश दिले आहेत.
श्रद्धा हत्याकांडात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. तसेच आफताब पूनावाला याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी देशभरातून होत आहे. शुक्रवारी साकेत न्यायालयाने रोहिणी फॉरेन्सिक सायन्स लॅबला 15 दिवसांत आफताबची नार्को चाचणी करण्याचे आदेश दिले. वास्तविक, जेव्हा आरोपीची नार्को टेस्ट केली जाते, तेव्हा त्याची संमतीही आवश्यक असते. आफताबला जेव्हा कोर्टात विचारण्यात आले की, तो नार्को टेस्ट करायला तयार आहे का? तेव्हा त्याने संमती दिली.
श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबने चौकशीदरम्यान पोलिसांना आणखी बऱ्याच अनेक गोष्टी सा्ंगीतल्या आगेत, श्रद्धाची हत्या केल्यानंतर त्याने बाहेरून एक करवत आणली आणि बाथरूममध्ये श्रद्धाचा मृतदेह कापायला सुरुवात केली. काही वेळाने तो थकला तेव्हा त्याने बाहेरून जेवण मागवले. त्यांनी मृतदेहासमोर बसून जेवन केले. यादरम्यान त्याने बिअरही प्यायली आणि त्यानंतर त्याने वेब सीरिज पाहिली असा खुलासा केला.
श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबला फाशी मिळावी या मागणीसाठी मुरगूड (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथे निषेध फेरी काढण्यात आली.