
no images were found
शिवाजी विद्यापीठात निसर्गोपचार दिनानिमित्त रानभाज्या विषयावर व्याख्यान संपन्न
कोल्हापूर : राष्ट्रीय निसर्गोपचार दिनाचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागात दैनंदिन जीवनात रानभाज्यांचे महत्व या विषयावर डॉ. अशोक वाली यांचे व्याख्यान झाले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून विभागाचे संचालक डॉ. आर. जी. पवार उपस्थित होते.
यावेळी डॉ. वाली यांनी रानभाज्यांची ओळख, प्रकार व त्यांचे औषधी गूणधर्म याबाबत माहिती दिली. दैनंदिन जीवनात रानभाज्यांचा वापर कसा करावा, हे दर्शवणारा छोटासा माहितीपटही सादर करण्यात आला, व्याख्यान प्रसंगी इनॉला अशा केना, पेंडुर, काटेकोळशेंदा, मोरशेंड, चांगेरी, वंशवेल, औदूंबर जलाची माहिती देण्यात आली. कार्यक्रम समन्वयक डॉ. सुमन बूवा, यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
स्वागत आसावरी कागवाडे, प्रास्ताविक व परिचय डॉ. श्वेतलिना पाटील यांनी करून दिला. यावेळी डॉ. वसंत सिंघन, डॉ. गोखले, श्री. उदय घाटे उपस्थित होते. सूत्रसंचालन सागर जाधव यांनी केले. तर आभार अरविंद पालके यांनी मानले.