no images were found
राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षेत गुणवत्ता यादीत कोल्हापूरच्या दोघींची बाजी
कोल्हापूर : महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा – २०२१ या परीक्षेतील राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या ६०९ व सहायक कक्ष अधिकारी संवर्गाच्या १०० पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूरच्या आरती शिंदे आणि डॉ. धनश्री गवळी यांना यश मिळाले आहे.
तात्पुरती निवड यादी व सर्व साधारण गुणवत्ता यादी या निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाच्या असून उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणीअंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये, शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो. त्याआधारे उमेदवारांकडून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प मागविण्यात येत असल्याची माहिती, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिली आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना कितीही अपयश, संकट आली तरी सातत्य, संयम आणि चिकाटी ठेवली पाहिजे. जिद्द आणि कष्टाचे फळ निश्चितच गोड मिळते, असे खंडोबा तालीम येथे राहत अससेल्या आरती शिंदे यांनी सांगितले. त्यांना आई माधुरी शिंदे, वडील महादेव शिंदे, शुभम शिंदे यांचे सहकार्य लाभले. कुटुंबीयांचे मार्गदर्शन, अभ्यासातील सातत्यामुळेच यश मिळाल्याचे धनश्री गवळी (साळवे) यांनी सांगितले. त्यांना पती तुषार गवळी, आई अनिता साळवे, वडील सुरेश साळवे यांचे मार्गदर्शन लाभले.’