Home मनोरंजन मराठी संस्कृती, भाषा आणि शिक्षण या जिव्हाळ्याच्या विषयांना ‘बालभारती’ जोडतो – मुख्यमंत्री

मराठी संस्कृती, भाषा आणि शिक्षण या जिव्हाळ्याच्या विषयांना ‘बालभारती’ जोडतो – मुख्यमंत्री

0 second read
0
0
58

no images were found

मराठी संस्कृती, भाषा आणि शिक्षण या जिव्हाळ्याच्या विषयांना ‘बालभारती’ जोडतो – मुख्यमंत्री

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी ‘बालभारती’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून त्याचे तोंडभरून कौतुक केले असून या चित्रपटाला खूप शुभेच्छा दिल्या आहेत. हा चित्रपट मराठी संस्कृती, भाषा आणि शिक्षण या आपल्यासाठी जिव्हाळ्याच्या गोष्टीना एकत्र जोडतो, असे गौरवोद्गार श्री शिंदे यांनी काढले आहेत.माननीय मुख्यमंत्र्यांनी या चित्रपटाचा नुकताच प्रकाशित झालेला ट्रेलर आवडीने पहिला आणि त्यावरील आपले म्हणणे व्हिडीओ चित्रित करून दिले. त्याचबरोबर चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छाही दिल्या.

“बालभारती चित्रपटाचा ट्रेलर मी पहिला आणि मला तो खूप आवडला. हा चित्रपट मराठी संस्कृती, भाषा आणि शिक्षण या अगदी जिव्हाळ्याच्या अशा मुद्द्यांना एकत्रित जोडतो. पालकांची आपल्या मुलांच्या शिक्षणाबद्दलची कळकळ या चित्रपटात अगदी गमतीशीर पद्धतीने मांडली गेली आहे. मी ‘बालभारती’च्या संपूर्ण टीमला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो,” असे उद्गार मा. मुख्यमंत्र्यांनी या संदेशात काढले आहेत.या ट्रेलरचे प्रकाशन शालेय शिक्षणमंत्री श्री दीपक केसरकर यांच्या हस्ते बालदिनी म्हणजे १४ नोव्हेंबर रोजी मुंबईत झाले. त्यांनीही या चित्रपटात हाताळल्या गेलेल्या विषयासाठी चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांचे कौतुक केले आहे. ‘बालभारती’ हा मराठी चित्रपट येत्या २ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. सर्वांच्या आवडीचा विषय हलक्या-फुलक्या पद्धतीने सादर केला असल्याने ‘बालभारती’बद्दल उत्सुकता लागून राहिली आहेच पण अनेक गाजलेल्या हिंदी मालिका देणाऱ्या निर्मात्याकडून या चित्रपटाची निर्मिती होत असल्यानेही मराठी चित्रपटसृष्टीत त्याबद्दल विशेष कुतूहल आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन नंदन यांनी केले असून निर्माते कोमल व संजय वाधवा हे या चित्रपटाची निर्मिती त्यांच्या ‘स्फीयरओरिजीन्स’ या कंपनीच्या माध्यमातून करत आहेत. यात सिद्धार्थ जाधव, नंदिता पाटकर, आर्यन मेंघजी यांच्या प्रमुख भूमिका असून ग्लॅमरस अभिजित खांडकेकर एका विशेष भूमिकेत दिसणार आहे. रवींद्र मंकणी, संजय मोने आणि उषा नाईक या ज्येष्ठ कलाकारांच्या विशेष भूमिका या चित्रपटात आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…