no images were found
जलसंधारण काळाची गरज – अमोल घाडगे
शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटच्या वतीने “जलसंधारण : घाडगेवाडी गावचा अभ्यास” या विषयावर श्री अमोल घाडगे यांचे व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याखान्यामध्ये अमोल घाडगे यांनी प्रमुख वक्ते म्हणून आधुनिक काळातील जलसंधारणाचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सांगली जिल्ह्यातील घाडगेवाडी या गावाचे शाश्वत विकास कशा प्रकारे जलसंधारणाच्या माध्यमातून घडवून एक आदर्श निर्माण केला. याचे जिवंत चित्रण आपल्या अनुभवातून व व्याख्यानातून स्पष्ट केले. घाडगेवाडी गावाच्या पाणी संधारणाच्या कार्यामुळे त्यांना २०१८ साठी पाणी फौंडेशनशनच्या द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार सुद्धा मिळाला होता. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. संतोष सुतार यांनी केले होते. तर कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून वाय. सी.एस.आर.डी चे प्र.संचालक डॉ. नितीन सी. माळी होते. या कार्याक्रमाचे सूत्रसंचालक डॉ. विशाल ओव्हाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. कविता वड्राळे यांनी केले.