no images were found
इंटर्नशिप मेळाव्यास उस्फुर्त प्रतिसाद
कोल्हापूर : संगणकशास्त्र अधिविभाग, सेंट्रल प्लेसमेंट सेल, शिवाजी विद्यापीठ आणि आय. टी. असोसिएशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने इंटर्नशिप मेळाव्याचे आयोजन दि. १० डिसेंबर २०२२ रोजी संगणकशास्त्रअधिविभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे करण्यात आले. “उद्योग व शैक्षणिक संस्था यांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण संधी उपलब्ध होणे आवश्यक असलयाचे” मत तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक प्रा. डॉ. एस. एन सपली यांनीया इंटर्नशिप मेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. कविता ओझा, संगणकशास्त्र अधिविभागप्रमुख यांनी इंटर्नशिपचे महत्व व त्यातून उपलब्ध होणाऱ्या संधी याबाबत विवेचन केले. प्रा. डॉ. गजानन राशीनकर, समन्वयक, सेंट्रल प्लेसमेंट सेल, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी सेंट्रल प्लेसमेंट सेल कडून विद्यार्थ्यांना नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याबात सुरु असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमाबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी आय.टी. असोसिएशनचे अध्यक्ष श्री. प्रताप पाटील यांनी विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर उद्योगामध्ये आवश्यक कौशल्य प्रशिक्षण व इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासनदिले.डॉ. उर्मिला पोळ यांनी आभार प्रदर्शन केले. इंटर्नशिप मेळाव्यासशिवाजी विद्यापीठातील अधिविभाग, संलग्नित महाविद्यालये, शासकीय अभियंत्रिकी महाविद्यालय कराड, संजय घोडावत विद्यापीठ, भारती विद्यापीठ तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातील १२०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.कोल्हापुरातील ३० आय. टी. कंपन्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप देण्यासाठी उपलब्ध होत्या.
यावेळी सेंट्रल प्लेसमेंट सेलचेप्रा. डॉ. गजानन राशीनकर,आय.टी. असोसिएशनचेश्री. रणजित नार्वेकर, श्री. राहूल मेंच व इतर पदाधिकारी, संगणकशास्त्र अधिविभागातील सर्व प्राध्यापक, विविध महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच आय. टी. कंपन्याचे मॅनेजर व विद्यार्थी उपस्थित होते. या इंटर्नशिप मेळाव्यात सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठातर्फे रोजगार कौशल्ये आणि संगणकशास्त्र विषयाचे व्यावसायिक प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे. इंटर्नशिप मेळाव्याच्या माध्यमातून विध्यार्थ्यांना संधी उपलब्ध झाली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. विजयकुमार कुंभार, डॉ. कबीर खराडे, डॉ. स्मिता काटकर, डॉ. शितल गायकवाड, श्री.जयकुमार भोसले, श्री. गणेश पाटील,श्री.श्रीकांत भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले.