no images were found
भारतीय लष्करात महिलांना पहिल्यांदाच कमांडो म्हणून काम करण्याची संधी : लवकरच अधिकृत घोषणा
भारतीय लष्कराच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांना कमांडो म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. यासंबंधीची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता असून त्यादृष्टीने भारतीय नौदलाने आपल्या एलिट स्पेशल फोर्समध्ये महिलांचा समावेश करण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. पहिल्यांदाच महिलांना लष्करामध्ये कमांडो म्हणून काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. रविवारी भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांकडून ही माहिती समजली. यासंबंधी लवकरच घोषणा होण्याची शक्यता वर्तविली आहे.
लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या विशेष दलांमध्ये असणाऱ्या कमांडोंना अतिशय कठोर असे प्रशिक्षण देण्यात येत असते. या कमांडोंवर विशेष आणि गुप्त ऑपरेशन्स करण्याची मुख्य जबाबदारी सोपविली जाते. या कमांडोसाठी आतापर्यंत फक्त पुरुषांना परवानगी होती. परंतु आता भारतीय नौदल महिलांनाही कमांडो होण्याची संधी देणार आहे.
यासंदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आता प्रशिक्षणानंतर महिलांनी निकष पूर्ण केल्यास त्यांना नौदलामध्ये ‘मरीन कमांडो’ म्हणजे मार्कोस होण्यासाठी संधी मिळेल. भारतीय लष्करी इतिहासातील हे एक ऐतिहासिक पाऊल असेल. असे असले तरी कोणासही यामध्ये थेट विशेष दलात सामील केले जाणार नाही. महिला कमांडोंना स्वयंसेवक म्हणून काम करावे लागेल. यासंबंधी लवकरच घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.