no images were found
विराट कोहलीच्या नावावर आणखी एक विक्रम नोंद
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने आपल्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे. बांगलादेश विरुद्धच्या वनडे मालिकेतील तिसर्या सामन्यामध्ये विराट कोहलीने दमदार शतक करून ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगचा विक्रम मोडला. भारत आणि बांगलादेश वनडे सामन्यात विराट कोहली याने सर्वोत्कृष्ट फलंदाजीचे दर्शन घडवले. त्याने ८५ चेंडूत ११ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने शतक पूर्ण केले. विराटचे वनडेमधील ४४वे तर एकूण कारकीर्दीमधील हे ७२ वे शतक ठरले.
रिकी पाँटिंगची आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीमध्ये ७१ शतके झळकली होती. विराट कोहलीचे वनडेमधील ४४ वे तर एकूण कारकीर्दीमधील हे ७२ वे शतक ठरले. विराट कोहली हा सर्वाधिक शतकी खेळी करणारा जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. अग्रस्थानी सचिन तेंडुलकर असून, त्याने १०० शतके झळकाविली आहेत. बांगलादेशमध्ये १००० धावा पूर्ण करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला असून अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे.