Home मनोरंजन तृतियपंथीयांनी केली ऐश्वर्या खरेच्या पालकांकडे तिची अनपेक्षित प्रशंसा

तृतियपंथीयांनी केली ऐश्वर्या खरेच्या पालकांकडे तिची अनपेक्षित प्रशंसा

8 second read
0
0
131

no images were found

तृतियपंथीयांनी केली ऐश्वर्या खरेच्या पालकांकडे तिची अनपेक्षित प्रशंसा

        प्रसारणास प्रारंभ झाल्यापासूनच ‘झी टीव्ही’वरील ‘भाग्यलक्ष्मी’ ही मालिका नेहमीच चांगल्या कारणांसाठी चर्चेत राहिली आहे. मालिकेतील ऐश्वर्या खरे आणि रोहित सुचांती या प्रमुख कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले.अलीकडच्या भागांमध्ये पाहिले की ऋषीने लक्ष्मीचा विश्वासघात केला आणि त्यामुळे ते आता घटस्फोट घेणार आहेत. तसेच सर्वजण आता ऋषीचे लग्न मलिष्काशी (मीरा मिश्रा) करण्याची तयारी करीत आहेत. दुसरीकडे लक्ष्मीनेही बलविंदरशी (अंकित भाटिया) लग्न करण्यास मंजुरी दिली आहे. तितक्यात योगायोगाने लक्ष्मीला बलविंदरची पहिली पत्नी कमली हिच्याबद्दल माहिती समजते. त्यांच्या लग्नापूर्वीच तिला बलविंदरपासून मूल होणार असते. अशा अनपेक्षित कलाटण्यांमुळे ही मालिका दिवसेंदिवस खूपच उत्कंठावर्धक होत चालली आहे.

      प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी मालिकेतील सर्व कलाकार हे दिवसरात्र काम करीत असून ऐश्वर्या खरेला प्रेक्षकांचे उदंड प्रेम आणि आशीर्वाद प्राप्त होत आहेत. किंबहुना अलीकडेच काही तृतियपंथीय लोकांनी तिच्या भोपाळमधील घरी जाऊन तिच्या पालकांकडे तिची प्रशंसा केली. ऐश्वर्याच्या वडिलांना तिचा प्रचंड अभिमान वाटत असल्याने त्यांनी आपल्या घराबाहेर ऐश्वर्याचे भले मोठे पोस्टर लटकाविले आहे. तिच्या वडिलांनी नुकतीच एक नवी मोटार विकत घेतली होती. त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हे तृतियपंथीय त्यांच्या घरी गेले असता, त्यांनी ऐश्वर्याचे हे पोस्टर पाहिले. तेव्हा त्यांनी ऐश्वर्याच्या अभिनयाची मुक्त कंठाने स्तुती केली. आपण ऐश्वर्या खरेचे खूप मोठे चाहते असल्याचे सांगून त्यांनी ऐश्वर्यासाठी एक व्हिडिओ संदेशही तयार केला. त्यात त्यांनी नमूद केले आहे की त्यांनी आजवर भाग्यलक्ष्मीचा एकही भाग पाहण्याचे चुकविले नसून त्यांना दोघांची जोडी खूप आवडते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…