
no images were found
सेवायोजन कार्डशी आधार क्रमांक लिंक करा – सहायक आयुक्त सं.कृ.माळी
कोल्हापूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या महास्वयंम पोर्टलवर नोंदणी (Employment card) केली आहे. आधार कार्ड नंबर व ईमेल, मोबाईल नंबर लिंक केलेला नाही, अशा उमेदवारांनी सदर नोंदणी (Employment card) मध्ये आधारकार्ड नंबर, ईमेल, मोबाईल नंबर लिंक करावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सं.कृ.माळी यांनी केले आहे.
माहिती अद्यावत करण्यासाठी उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाने विकसित केलेल्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेत स्थळाच्या मुख्य पृष्ठावरील रोजगार (Employment) हा पर्याय निवडून नोकरी साधक (Job Seeker) हा पर्याय निवडून आपला युजर आयडी व पासवर्ड वापरुन Login व्हावे व आधार नंबर या ठिकाणी आपला आधार नंबर नमूद करुन कॅप्च्या (Captcha) टाकून सबमिट (Submit) या बटनावर क्लिक करावे, जेणेकरून आपली माहिती अद्यावत होईल.
सेवायोजन कार्डशी आधार लिंक करताना, काही अडचण आल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0231-2545677 वर संपर्क साधावा, असेही श्री. माळी यांनी सांगितले आहे.
नवीन नाव नोंदणी पाथ (Employment card)
www.mahaswayam.gov.in → Home Page → Employment → Job Seeker → Rejister
आधार कार्ड लिंक करण्याचा पाथ
ज्या उमेदवारांनी वेबपोर्टलवर (Employment card) काढले आहे.
www.mahaswayam.gov.in → Home Page → Employment → Job Seeker → User ID → Pass Word → Login → Adhar Number → Captcha → (Submit) या बटनावर क्लिक करावे.