Home मनोरंजन ‘इत्ती सी खुशी’ने धाडसी नवीन दृष्टिकोनासह केली प्रेमाची नवी व्याख्या

‘इत्ती सी खुशी’ने धाडसी नवीन दृष्टिकोनासह केली प्रेमाची नवी व्याख्या

11 second read
0
0
34

no images were found

‘इत्ती सी खुशी’ने धाडसी नवीन दृष्टिकोनासह केली प्रेमाची नवी व्याख्या

टेलिव्हिजनवरील नेहमी बलिदान देणाऱ्या त्याग-मूर्ती स्त्रियांच्या चित्रणाला धक्का देत सोनी सबवरील ‘इत्ती सी खुशी’ मालिकेने अन्विता (सुंबुल तौकीर खान) ही व्यक्तिरेखा सादर केली आहे, जी रूढींना आव्हान देण्याची हिंमत करते. एरवी टेलिव्हिजनवरील स्त्रिया निःस्वार्थी आणि आपल्या प्रियजनांसाठी कोणतेही दुःख सोसण्यास तयार असतात पण अन्वितासमोर जेव्हा कठीण पर्याय निवडण्याची वेळ येते, तेव्हा ती धाडसी निर्णय घेते.

आपल्या प्रियजनांच्या बचावासाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या साचेबंद टेलिव्हिजन नायिकांपेक्षा वेगळी असलेली अन्विता आधी स्वतःचा विचार करताना दिसते, अगदी स्वतःच्या कुटुंबापेक्षाही. तिचा निर्णय उदासीनतेमधून आलेला नाही, तर आपल्या भावंडांसाठी स्वतःच्या हिताचे रक्षण करण्याच्या जबाबदारीतून आला आहे.

जेव्हा तिच्या वडिलांना, सुहासला (वरुण बडोला) लिव्हर सिरॉसिस झाल्याचे निदान होते, आणि तातडीने लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याची गरज निर्माण होते, तेव्हा अन्विताला समजते की ती आपले लिव्हर दान करण्यास पात्र आहे. पण भावनेच्या उर्मीत निर्णय घेण्याऐवजी ती आपल्या कुटुंबाचा दूरवर विचार करते- खास करून तिची धाकटी भावंडे, जी तिच्यावर अवलंबून आहेत.

अशाप्रकारे आपले लिव्हर दान न देण्याचा तिचा निर्णय स्वार्थीपणातून आलेला नसून कुटुंबाच्या काळजीतून आणि दूरदृष्टीमधून आला आहे. अन्विता क्षणिक भावनेच्या भरात वाहून जात नाही आणि ती ओळखते की तिच्या कुटुंबाच्या भावी स्थैर्यासाठी तिचे असणे आणि निरोगी राहणे खूप महत्त्वाचे आहे. सगळ्या परिणामांचा विचार करून ती प्रेम आणि जबाबदारीची आपली वास्तववादी समज दाखवते.

एका जिवाऐवजी आपल्या भावंडांच्या रूपात अनेक जिवांचे रक्षण करण्याचा निर्णय घेऊन अन्विता एक सक्षम, समकालीन नायिका कशी असली पाहिजे हे दाखवून देते. तिचा प्रवास म्हणजे एक अशी कहाणी आहे, जी केवळ भावनिक नाही, तर विचार प्रेरक आहे, ‘प्रेम म्हणजे बलिदान’ या संकल्पनेला शह देणारी आहे.

हा प्रोमो येथे बघा: https://www.instagram.com/p/DQoJ-VdjcyN/

आगामी कथानकाविषयी बोलताना सुंबुल म्हणते, “शरण जाऊन नाही, तर जे योग्य वाटते त्याबाबत ठाम राहून शौर्याची नव्याने व्याख्या करणारी व्यक्तिरेखा साकारताना खूप छान वाटते आहे. अन्विताचे जीवन हा हिंमत आणि करुणा यांची कहाणी आहे. आपल्या भावंडांवर तिचे जिवापाड प्रेम आहे. प्रचंड भावनिक संघर्षातून तिच्या निर्णयाचे नवनीत वर आले आहे. कधीकधी आपल्या माणसांची काळजी घेणे याचा अर्थ कठीण निवड करणे असा होतो. हे निर्णय समजायला अवघड असतात. आपले प्रेम आणि जबाबदारी याबाबत अन्विता अत्यंत ठाम आहे, हेच तिचे वेगळेपण आहे. तिच्या व्यक्तिरेखेतून आपल्याला हा बोध होतो की ताकद केवळ बलिदान देण्यात नसते; स्पष्टता, काळजी आणि सर्वांसाठी जे योग्य आहे ते करण्याची हिंमत दाखवण्यात देखील असते.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक कोल्हापूर : …