no images were found
मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन
कोल्हापूर: बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्यनेते आणि मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांचा दि.०९ फेब्रुवारी रोजी होणारा वाढदिवस समस्त शिवसैनिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. राज्याचे लाडके मुख्यमंत्री ठरलेल्या मा.ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांचा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. याअनुषंगाने बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यभर विविध आरोग्य विषयक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा उपक्रम राबविले जाणार असून, मा.मुख्यमंत्री साहेबांचा वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा होण्याकरिता राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यात विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने उद्या श्री अंबाबाई मंदिर येथे युवासेनेमार्फत, कसबा बावडा ग्रामदैवत श्री. हनुमान मंदिर येथे शिवसेना विभाग कसबा बावडा, भुयेवाडी ग्रामदैवत श्री.भैरवनाथ मंदिर येथे शाखा भुयेवाडी यांच्यावतीने मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याची प्रगती होवो, असे साकडे घालून महाभिषेक करण्यात येणार आहे. शिवसेना जिल्हा व शहर कार्यकारणीच्या वतीने उद्या सायंकाळी ७.०० वाजता शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय शनिवार पेठ येथे केक कापून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.