
no images were found
पुण्यात रिक्षाचालक संघटना आक्रमक; आजही संपावर
पुणे : पुण्यात रिक्षाचालकांचे चक्काजाम आंदोलन आज आहे त्यामुळे सोमवारी रिक्षा वाहतूक बंद राहणार आहे. मुळे रिक्षा संघटनांच्या मागण्या मान्य न झाल्याने रिक्षाचालक पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याचे समजते.
पुण्यातील अनेक रिक्षा संघटना बंदमध्ये सहभागी होणार आहेत. या रिक्षा आंदोलनात जवळजवळ एक लाखाहून अधिक रिक्षाचालकांचा सहभाग असणार आहे. 14 दिवसांचा अल्टिमेटम देऊनही प्रशासनाने मागण्या पूर्ण केल्या नसल्यामुळे प्रशासनाकडून फसवणूक झाल्याचा आरोप करीत रिक्षा चालक संघटनेने चक्काजाम आंदोलन छेडले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश असूनही अधिकाऱ्यांनी बेकायदा बाईक टॅक्सीवर कारवाई केली नाही असा आरोप संघटनांकडून केला जात आहे. आज आरटीओ कार्यालयाबाहेर रिक्षा चालक चक्काजाम आंदोलन करणार आहेत. या आंदोलनामुळे पुण्यातील प्रवाशांना अडचणीला सामोरे जावे लागेल.