
no images were found
नववर्षात तालिबान्यांचा काबुलच्या सैन्य तळावर मोठा हल्ला, अनेकांचा मृत्यू
काबूल : अफगाणिस्तानातील काबूलमध्ये आज सकाळी लष्करी विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरुन गेलाय. स्फोटाच्या घटनेमध्ये आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. हा हल्ला अफगाणिस्तान सैन्य दलाच्या हवाई तळावर झाल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.
रविवारी झालेल्या स्फोटात १० जणांचा मृत्यू झाला आहे तर ८ लोक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, मृत्यूबाबत अद्याप अधिकृत आकडेवारी समोर आली नाही. हल्ला हा आंतरराष्ट्रीय विमानतळावर झाल्याचं मंत्रालय प्रवक्ते अब्दुल नाफी टाकोर यांचं म्हणणं आहे.
दरम्यान, बॉम्बस्फोटात काही नागरिक मारले गेल्याचं देखील अब्दुल नाफी टाकोर यांनी म्हटलंय. काही दिवसांपूर्वी काबूलच्या एका हॉटेलमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. त्यावेळी चीनचे काही वरिष्ठ अधिकारी त्याठिकाणी उपस्थित होते. त्यावेळी चकमक झाल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे आता गुप्तहेर खातं आता अलर्ट मोडवर असल्याचं पहायला मिळंतय.