Home क्राईम दिल्लीमध्ये बलोनो कारने १० किमी फरफटत नेल्यानं सगळी हाडं मोडून तरुणी ठार

दिल्लीमध्ये बलोनो कारने १० किमी फरफटत नेल्यानं सगळी हाडं मोडून तरुणी ठार

2 second read
0
0
40

no images were found

दिल्लीमध्ये बलोनो कारने १० किमी फरफटत नेल्यानं सगळी हाडं मोडून तरुणी ठार

नवी दिल्ली : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीमध्ये संतापजनक घटना घडली. दारूच्या नशेत पाच तरुणांनी बलोनो कारने तरुणीला सुमारे १० किमी फरफटत नेल्यामुळे पीडित तिची सगळी हाडं तुटूनतिचा मृत्यू झाला. पीडित मुलीच्या अंगावर एकही कपडा उरला नव्हता. आता या भयानक रस्ते अपघाताचा व्हायरल व्हिडिओमध्ये या तरुणांची बलेनो कार जाताना दिसत आहे.
या घटनेनं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. दिल्ली पोलिसांनी पाचही आरोपी युवकांना अटक केली आहे. यातील एक क्रेडिट कार्ड कलेक्शनचं काम करतो. मृत तरुणी पार्ट टाईम जॉब करत होती. याप्रकरणी दिल्ली महिला आयोगाने (DCW) पोलिसांना नोटीसही बजावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांजवाला पोलीस स्टेशन (रोहिणी जिल्हा) येथे पहाटे ३ वाजून २४ मिनिटांनी कुतुबगढ भागाकडे जाणाऱ्या कारला एक मृतदेह बांधलेला असल्याची माहिती मिळाली. त्यांनी सांगितलं की, मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मंगोलपुरी येथील संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.
पोलिस उपायुक्त हरेंद्र कुमार सिंग यांनी सांगितलं की, पीडितेचा पाय कारच्या एका चाकात अडकला आणि तिला गाडीसोबतच फरफटत नेण्यात आलं. भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 279 (रॅश ड्रायव्हिंग) आणि 304-A (निष्काळजीपणामुळे मृत्यू) या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक खन्ना (26), अमित खन्ना (25), कृष्णा (27), मिथुन (26) आणि मनोज मित्तल यांना अटक करण्यात आली आहे. दीपक हा ड्रायव्हर आहे, अमित उत्तम नगरमध्ये एसबीआय कार्डचं काम करतो, कृष्णा कॅनॉट प्लेसमध्ये काम करतो, मिथुन नारायणा येथे हेयर ड्रेसर म्हणून काम करतो आणि मित्तल सुलतानपुरीमध्ये एका खाजगी खाद्य वितरण कंपनीचा प्रतिनिधी म्हणून काम करतो. कार चालक दारूच्या नशेत होता की नाही हे तपासण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडित मुलगी लग्नसमारंभ आणि इतर कार्यक्रमात पार्ट टाईम काम करायची. जेव्हा ही घटना घडली तेव्हा ती अशाच एका कार्यक्रमातून घरी परतत होती.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात स्थानिक स्वराज्य संस्थाचे योगदान महत्त्वपूर्ण –  सी.पी.राधाकृष्णन

ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात स्थानिक स्वराज्य संस्थाचे योगदान महत्त्वपूर्ण – …