Home स्पोर्ट्स श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या ७५  व्या वाढदिवसानिमित्त शाहू खासबाग मैदानवर निकाली कुस्त्यांचे जंगी मल्लयुद्ध

श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या ७५  व्या वाढदिवसानिमित्त शाहू खासबाग मैदानवर निकाली कुस्त्यांचे जंगी मल्लयुद्ध

2 second read
0
0
127

no images were found

श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या ७५  व्या वाढदिवसानिमित्त शाहू खासबाग मैदानवर निकाली कुस्त्यांचे जंगी मल्लयुद्ध

कोल्हापूर :  कोल्हापूर शहर व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघातर्फे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या ७५  व्या वाढदिवसानिमित्त शाहू खासबाग मैदान येथे निकाली कुस्त्यांचे जंगी मल्लयुद्ध आयोजित केले आहे. या कार्यक्रमाला खासदार शरद पवार उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते शाहू महाराजांना चांदीची गदा देऊन सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत अशी माहिती तालीम संघाचे अध्यक्ष उद्योजक व्ही.बी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रथम क्रमांकाची कुस्ती विजयी शाहू गंगावेस तालमीचा पैलवान महान भारत केसरी सिकंदर शेख विरुद्ध पंजाबचा पैलवान हिंदकेसरी भारत केसरी गौरव मच्छीवाला यांच्यात होणार आहे. गंगावेस तालमीचा उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर विरुद्ध पंजाब गुरुभवानी आखाड्याचा मल्ल सतनाम सिंग यांच्यात दुसऱ्या क्रमांकासाठी लढत होणार आहे.

पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीतील सिकंदर शेख यांनी अल्पावधीत कमी वयात कुस्ती क्षेत्रात देशभर नाव कमावलेले आहे. पंजाब,उत्तर प्रदेश, हरियाणा मधील नामवंत मल्लांना आस्मान दाखवून पंजाबमध्ये सर्वाधिक कुस्त्या जिंकलेला मल्ल म्हणून नावलौकिक मिळवला आहे. कुस्ती जिंकल्याबद्दल त्याने अनेक चार चाकी,, दुचाकी वाहने जिंकली आहेत. गौरव मच्छीवाला हा हिंदकेसरी असून त्याने आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. मैदानी कुस्तीतील हुकमी पैलवान अशी त्याची ख्याती आहे. माऊली जमदाडे, जस्सापट्टी या नामांकित मल्लांना त्यांने हरवलेले आहे. पत्रकार परिषदेला युवराज संभाजीराजे, युवराज मालोजीराजे, तालीम संघाचे सचिव महादेवराव आडगुळे, आर. के. पोवार, अशोक पोवार, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, हिंदकेसरी विनोद चौगुले, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, माजी नगरसेवक आदिल फरास, विनायक फाळके आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सु…