
no images were found
इचलकरंजीत भटक्या कुत्र्यानी घेतला वृद्धेचा बळी
इचलकरंजी : येथील गोसावी गल्ली परिसरात राहणाऱ्या वृद्धेवर शनिवारी पहाटे १५ ते २० भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने आयजीएम रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.rनागव्वा अर्जुन कांबळे (वय ६५) असे त्यांचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, भटक्या कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
नागव्वा या शनिवारी पहाटे चार वाजता घरातून बाहेर आल्यानंतर तेथे जमलेल्या भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे त्या खाली पडल्या कुत्र्यांनी त्यांच्या सर्वांगाचे लचके तोडले. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. आवाज ऐकून जमलेल्या नागरिकांनी कुत्र्यांना हुसकावून जखमी नागव्वा यांना ढकल गाड्यावरून तातडीने आयजीएम रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृतदेहचे विच्छेदन करण्याचे काम सुरु आहे.