no images were found
द कपिल शर्मा शो मध्ये सुधा मूर्ती म्हणाल्या, “मी इंजिनियर झाले नसते तर ..
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील द कपिल शर्मा शो आणखीन एक असा एपिसोड घेऊन येत आहे, ज्यात प्रेक्षकांसाठी मेजवानी असल्याची हमी आहे. ‘प्रभावी महिला’ शीर्षक असलेल्या या भागात भारतातील काही प्रभावशाली महिला वर्णी लावणार आहेत. यामध्ये प्रसिद्ध लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती, प्रसिद्ध अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्ती रवीना टंडन आणि पुरस्कार मिळवणारी चित्रपट निर्माती गुनीत मोंगा यांचा समावेश आहे. या विशेष महिलांनी आपल्या कारकिर्दीत अपार यश मिळवले आहे आणि लवचिकता, दृढनिर्धार आणि परिश्रम यांनी परिपूर्ण असलेल्या त्यांच्या कहाणीमुळे अनेकांसाठी त्या प्रेरणास्रोत बनल्या आहेत. तर, अशा प्रभावी स्त्रियांचा गौरव करण्यासाठी सज्ज व्हा. आमंत्रित महिला त्यांच्या आयुष्यातील आव्हाने आणि त्यांनी त्यावर केलेली मात यामधून जन्मलेली यशोगाथा सांगणार आहेत.
मनमोकळ्या गप्पांच्या ओघात होस्ट कपिल शर्मा सहजच सुधा मूर्तींना त्यांच्या चित्रपटांच्या आवडीविषयी विचारेल. तो सुद्धा मूर्तींना विचारेल की, त्यांनी कधी बॉलीवूड चित्रपट बघितले आहेत का? त्यांना एखादा अभिनेता विशेष आवडतो का? यावर सुधा मूर्ती म्हणाल्या, “मी माझ्या आयुष्यात अनेक चित्रपट बघितले आहेत. एकदा मी पुण्यात असताना कोणी तरी मला आव्हान दिले होते की मी दररोज चित्रपट बघू शकते का. मी म्हटले, “त्यात काय एवढे? आणि त्यानंतर 365 दिवसांत मी 365 चित्रपट बघितले होते! मी लहान होते तेव्हा दिलीप कुमार माझा आवडता अभिनेता होता.दिलीप कुमार अप्रतिम होता. त्याच्या नंतर मला कोणी आवडत असेल, तर तो म्हणजे शाहरुख खान आहे. मी जेव्हा वीर झारा चित्रपट बघितला, तेव्हा माझ्या मुलीला म्हटले होते की, जर दिलीप कुमार तरुण असता, तर त्याने ही भूमिका केली असती. पण आता शाहरुख खान त्याची जागा घेत आहे. आणि या चित्रपटात फक्त तोच असा अभिनय करू शकत होता. बजरंगी भाईजानच्या बाबतीत देखील असेच आहे. मी म्हटलं होतं की, फक्त सलमान खानच पडद्यावर असा लहान मुलासारखा निष्पाप भाव जिवंत करू शकतो. त्यामुळे या भूमिकेसाठी त्याची निवड योग्यच होती. मी जेव्हा चित्रपट बघते, तेव्हा त्यातील दिग्दर्शन, टेक्स आणि चित्रपटाच्या सौंदर्याविषयी नोट्स काढते. कारण मी खूप गंभीरपणे चित्रपट पाहते. मी जर इंजिनियरिंग झाले नसते, तर मी चित्रपट समीक्षक होऊन अनुपमा चोप्राशी स्पर्धा केली असती (हसतात)! मला चित्रपट बघायला फारच आवडते!”