
no images were found
कुटुंबासोबत वेळ व्यतित केल्याने नेहमी उत्साहवर्धक वाटते!
आंतरराष्ट्रीय समुदाय कुटुंबांना देत असलेले महत्त्व व्यक्त करण्यासाठी दरवर्षी १५ मे रोजी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा केला जातो. एण्ड टीव्हीवरील कलाकार आयुध भानुशाली (कृष्णा, ‘दूसरी माँ’), योगेश त्रिपाठी (दरोगा हप्पू सिंग, ‘हप्पू की उलटन पलटन’) आणि शुभांगी अत्रे (अंगूरी, ‘भाबीजी घर पर है’)यांनाकुटुंबासोबत वेळ व्यतित करण्याचे महत्त्व माहित आहे आणि ते त्यांच्या दैनंदिन व्यस्त वेळापत्रकामधून वेळ काढत कशाप्रकारे त्यांच्या कुटुंबांसोबत वेळ व्यतित करतात याबाबत सांगत आहेत. मालिका ‘दूसरी माँ’मधील आयुध भानुशाली ऊर्फ कृष्णा म्हणाला, ‘‘मी संयुक्त कुटुंबामधून आलो आहे. मी माझी मालिका ‘दूसरी माँ’च्या शूटिंगसाठी जयपूरमध्ये असल्यामुळे मला माझ्या घरातील प्रेमळ वातावरणाची खूप आठवण येते. मला शूटिंगमधून सुट्टी मिळाली की, मी मुंबईला माझ्या घरी जाऊन त्यांच्यासोबत वेळ व्यतित करतो. घरातील प्रत्येकजण व्यस्त असले तरी मी घरी असताना संपूर्ण दिवसाचे नियोजन करतात आणि माझ्यासोबत उत्तम वेळ व्यतित करतात. आम्ही एकत्र भोजनाचा आस्वाद घेतो आणि दिवसभरात घडलेल्या गोष्टींबाबत गप्पागोष्टी करतो. आम्ही लहान सुट्टीवर धमाल करण्यासाठी देखील जातो आणि अनेक खास आठवणी साठवतो.’’
मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील योगेश त्रिपाठी ऊर्फ दरोगा हप्पू सिंग म्हणाले, ‘‘फूड हे माझ्यासाठी गप्पागोष्टी सुरू करणारे आहे आणि माझ्या पत्नीसोबत भोजनाचा आस्वाद घेण्यासारखा दुसरा आनंद नाही. सुदैवाने, माझी पत्नी देखील याबाबतीत वेगळी नाही. आम्ही लाँग ड्राइव्हवर देखील जातो आणि भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी नवीन ठिकाणांचा शोध घेतो. मी शूटिंगमध्ये व्यस्त असताना माझी पत्नी आमच्या वीकेण्ड प्लानचे नियोजन करते. हे लहान गेटवेज आमच्या व्यस्त जीवनामधून काहीसा विरंगुळा घेण्याची, मनसोक्त गप्पागोष्टी करण्याची आणि प्रेमळ आठवणी निर्माण करण्याची आमची पद्धत आहे.’’मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील शुभांगी अत्रे ऊर्फ अंगूरी भाभी म्हणाल्या, ‘‘मुलीसोबत वेळ व्यतित करणे नेहमीच आनंददायी असते, खासकरून ती किशोरवयीन असेल तर खूप धमाल येते. आमच्यामध्ये चित्रपट, संगीत, फॅशन अशा अनेक गोष्टींबाबत समान रूची आहे. आम्ही त्या सर्वांबाबत गप्पागोष्टी करतो. म्हणून मी रात्रीच्या जेवणापूर्वी माझे सर्व शूटिंग पूर्ण करते, ज्यामुळे मला माझ्या मुलीसोबत वेळ व्यतित करता येईतो आणि तिचा दिवस कसा गेला याबाबत जाणून घेता येते. तिच्यासोबत गप्पागोष्टी करत तिच्याकडून ऐकण्यामधून मिळणाऱ्या उत्साहासारखा दुसरा आनंद नाही. तिच्या मूडनुसार आम्ही रात्रीच्या जेवणाच्या वेळी कॉलेज गॉसिपपासून चालू घडामोडींपर्यंत गप्पागोष्टी करतो.’’