Home सामाजिक कॉ. पानसरे हत्या प्रकरणी उच्च न्यायालयातून आरोपींना जामीन मिळणे, ही समस्त हिंदुत्वनिष्ठांसाठी दिवाळीची आनंदवार्ताच ! – हिंदू जनजागृती समिती

कॉ. पानसरे हत्या प्रकरणी उच्च न्यायालयातून आरोपींना जामीन मिळणे, ही समस्त हिंदुत्वनिष्ठांसाठी दिवाळीची आनंदवार्ताच ! – हिंदू जनजागृती समिती

8 second read
0
0
28

no images were found

कॉ. पानसरे हत्या प्रकरणी उच्च न्यायालयातून आरोपींना जामीन मिळणे, ही समस्त हिंदुत्वनिष्ठांसाठी दिवाळीची आनंदवार्ताच ! – हिंदू जनजागृती समिती

कोल्हापूर: येथील कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणात कोणताही सबळ पुरावा नसतांना, कोणतीही गुन्हेगारी पृष्ठभूमी नसणार्‍या निरपराध हिंदुत्ववादी युवकांना अटक करून हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणाला १० वर्षे झाली असतांनाही कोल्हापूर येथील डाव्या-पुरोगामी गटांकडून दबाव निर्माण करून खटला लांबवून या युवकांना तुरुंगातच सडवत ठेवण्याचे षडयंत्र चालू होते; मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचने आज या प्रकरणातील अखेरच्या ३ संशयितांना जामीन मंजूर केल्याने, त्यांचे हे षडयंत्र अयशस्वी ठरले.

       या संशयितांमध्ये पूर्वी हिंदू जनजागृती समितीचे कार्य पहाणारे आणि कान-नाक-घसा तज्ञ असणारे डॉ. विरेंद्रसिह तावडे यांचाही समावेश आहे. त्यांच्यासह श्री. अमोल काळे आणि शरद कळसकर या हिंदुत्वनिष्ठांनाही जामीन संमत झाला आहे. ‘जामीन हा नियम; तर तुरुंग हा अपवाद आहे’, अशा प्रकारचे वाक्य न्यायाधिशांनी अनेक निवाड्यांत वापरले आहे; परंतु या खटल्यात पुरावा नसतांनाही या हिंदुत्वनिष्ठांना मात्र तुरुंगात वर्षानुवर्षे खितपत ठेवले गेले. या विरोधात लढणार्‍या अनेक मान्यवर अधिवक्त्यांनी अथक प्रयत्न करून त्यांची योग्य बाजू मांडून त्यांच्यावरील अन्याय मा. न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले, त्या सर्व अधिवक्त्यांचेही हिंदू जनजागृती समितीच्या वतीने अभिनंदन करत आहोत. दिवाळीच्या सणापूर्वीची ही वार्ता म्हणजे समस्त हिंदुत्वनिष्ठांसाठीच आनंदवार्ता आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मध्यपूर्वेतील युद्धाचा शेतकऱ्यांना फटका; सरकारने हस्तक्षेप करावा !

मध्यपूर्वेतील युद्धाचा शेतकऱ्यांना फटका; सरकारने हस्तक्षेप करावा ! ‘भाअक’चे रा…