no images were found
‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये मिथुनदा आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या आठवणींना उजाळा
झी टीव्हीवरील ‘सा रे ग म प’ हा दीर्घकाळ सुरू असलेला सिंगिंग रिअॅलिटी शो असून सुमारे 3 दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. संगीत क्षेत्रात आपले नाव कोरणाऱ्या श्रेया घोषाल, शेखर रावजिआनी, कुणाल गांजावाला, सुगंधा मिश्रा, कमाल खान, राजा हसन आणि वैशाली माडे अशा जबरदस्त कलाकारांना शोधून काढल्यानंतर झी टीव्ही आता पुन्हा एकदा गुणांचा खजिना असलेल्या छोट्या मुलांना त्यांच्या गायनाची कला दाखवण्यासाठी संधी प्रदान करत आहेत. आता ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’च्या नवव्या आवृत्तीत या सर्वात प्रतिष्ठेच्या व्यासपिठावर काही गुणी बालगायकांना ‘झी टीव्ही’ वाहिनी आपली कला सादर करण्याची संधी देणार आहे. या कार्यक्रमाचे नवे परीक्षक म्हणून नामवंत संगीतकार शंकर महादेवन, अनु मलिक आणि नीति मोहन तर सूत्रधार म्हणून भारती सिंगला आणले आहे.
आपल्या अफलातून गायनकलेने यातील टॉपचे 13 स्पर्धक प्रेक्षकांवर मोहिनी घालत असले, तरी येत्या वीकेण्डच्या भागात बॉलीवूडचे नामवंत स्टार मिथुन चक्रबोर्ती आणि पद्मिनी कोल्हापुरे हे विशेष अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. या भागाच्या चित्रीकरणादरम्यान सर्वच गुणी बालगायकांनी आपल्या सुमधुर आवाजाने परीक्षक आणि विशेष अतिथींवर मोहिनी घातली असली, तरी स्पर्धक अतनू आणि आरोही यांनी गायलेल्या ‘हम तुम्हें इतना प्यार करेंगे’ या गाण्याने सर्वांची मने चोरली. तसेच त्यांच्या ‘टॉम अॅण्ड जेरी’सारख्या नात्याने पद्मिनीजी आणि मिथुनदा यांना आपल्या चित्रपटांच्या चित्रीकरणाच्या वेळेची आठवण करून दिली. किंबहुना या तारकांनी सांगितले की त्यांच्यात जरी ‘टॉम अॅण्ड जेरी’सारखी मैत्री असली, तरी सेटवर ते नेहमीच एकत्र राहात. तसेच एकमेकांना सांभाळून घेत. इतकेच नव्हे, तर एकदा सेटवर मिथुनदांनी आपल्या पोटात दुखत असल्याचा बहाणा केला. त्यामुळे पद्मिनीजींना पळून जाऊन लग्न करता आले.