no images were found
करणवीर बोहरा म्हणतो, “पापाचा तिरस्कार करा; पाप करणाऱ्यांचा नाही
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन वाहिनीवरील ‘हम रहें ना रहें हम’ या मालिकेच्या मनोरंजक कथानकाने प्रेक्षकांना मोहित केले आहे, ज्यात गेल्या काही भागांमध्ये अनेक विस्मयकारक आणि धक्कादायक गोष्टी उलगडल्या आहेत. या आकर्षक कथेमध्ये आता दमयंती (किट्टू गिडवानी) असा दावा करताना दिसत आहे की स्वातीलेखा (प्रेरणा वनवारी) बारोट कुटुंबाला साजेशी सून आहे आणि दमयंतीचा दुसरा मुलगा राघवेंद्रशी (आभास मेहता) लग्न करण्यासाठी ती तिला पटवते. याशिवाय, समर (करणवीर बोहरा) राघवेंद्रसोबत मैत्री करून महालात शिरकाव करण्यात यशस्वी झाला आहे आणि बारोट कुटुंबामध्ये तणाव निर्माण होईल अशी एक खास योजना त्याच्या डोक्यात शिजत आहे.
घटनांच्या रोमांचक वळणावर, अनेक रहस्ये उलगडत जातील, कुटुंबातील समीकरणे बदलतील तसेच बारोट कुटुंबियांना लाज आणेल अशा षड्यंत्राचा पर्दाफाश होईल. शिवेंद्र (जय भानुशाली) आणि सुरीली (टीना दत्ता) यांचे लग्न बेगडी आहे असे संबोधून दमयंती त्यांना शाही विवाह कसा असतो हे दाखवायचे ठरवते. ती विवाह सोहळ्याची सर्व तयारी करण्याची जबाबदारी समरच्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीवर सोपवते. करणवीर बोहरा साकार करत असलेली समरची व्यक्तिरेखा मालिकेत उलगडत जाणाऱ्या घटनांमध्ये चैतन्य आणि रोमांच वाढवते, पण तो कोण आहे? आणि त्याच्या रहस्यमय कृतींमागे त्याचा खरा हेतू काय आहे? हे ज्वलंत प्रश्न अजून अनुत्तरित आहेत.
आपल्या भूमिकेविषयी बोलताना करणवीर बोहरा म्हणतो, “गुंतागुंतीचे कथानक आणि समर या माझ्या व्यक्तिरेखेमुळे बारोट घराण्यात जी अनपेक्षित वळणे येत आहेत, ते पाहून मला खरोखर खूप मजा येत आहे. तो एखाद्या बैलासारखा मुसंडी मारण्याची संधी शोधत आहे. मी अनेक मालिकांमधून नकारात्मक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत, पण ही भूमिका खरंच विलक्षण आहे. या व्यक्तिरेखेमध्ये नकारात्मकता नाही, पण परिस्थिती त्याला बदला घेण्यास प्रवृत्त करते. आगामी भागांमध्ये, अनेक खुलासे होतील, ज्यामुळे बारोट कुटुंबात एक नाट्यमय वळण येईल, जे सुरीलीसह, रानी माँ आणि तिच्या सर्व मुलांचे जीवन नक्कीच विस्कळीत करेल. समरने त्यांच्या विनाशासाठी अनेक योजना आखल्या आहेत. आत्तापर्यंत मला प्रेक्षकांकडून उदंड प्रेम मिळाले आहे. विशेष म्हणजे, माझ्या आधीच्या भूमिकांना मिळालेल्या प्रतिसादापेक्षाही जास्त माझ्या नकारात्मक भूमिकांच्या चित्रणाला प्रेक्षकांनी लगेच दाद दिली आहे. म्हणतात ना, “पापाचा तिरस्कार करा, पाप्याचा नाही!”