Home Uncategorized टाटा एआयएने पॉलिसीधारकांसाठी आजवरच्या सर्वात जास्त १,१८३ कोटी रुपयांच्या बोनसची घोषणा केली

टाटा एआयएने पॉलिसीधारकांसाठी आजवरच्या सर्वात जास्त १,१८३ कोटी रुपयांच्या बोनसची घोषणा केली

22 second read
0
0
34

no images were found

टाटा एआयएने पॉलिसीधारकांसाठी आजवरच्या सर्वात जास्त १,१८३ कोटी रुपयांच्या बोनसची घोषणा केली

मुंबई :  भारतातील एक आघाडीची जीवन विमा कंपनी टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडने (टाटा एआयए) आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी आपल्या सहभागी पॉलिसीधारकांसाठी ११८३ कोटी रुपयांचा बोनस घोषित केला आहे.  दरवर्षी ही कंपनी आपल्या पात्र पॉलिसीधारकांना बोनस देते आणि आर्थिक वर्ष २०२३ मधील बोनस आर्थिक वर्ष २०२२ मध्ये घोषित करण्यात आलेल्या ८६१ कोटी रुपयांच्या बोनसपेक्षा ३७% नी जास्त आहे.  एकूण ,४९,२२९ सहभागी पॉलिसीधारक या बोनससाठी पात्र आहेत.

फंड व्यवस्थापनाच्या उत्तम क्षमता, जोखीम व्यवस्थापनाच्या प्रभावी प्रथा यांच्यामुळे टाटा एआयए आपल्या सहभागी पॉलिसीधारकांना दरवर्षी अधिकाधिक बोनस देत असते.  या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पॉलिसीधारकांना अभिनव विमा सुविधांचा लाभ मिळत राहील हे देखील कंपनी सुनिश्चित करत असते. पॉलिसीच्या नूतनीकरणामध्ये पुन्हा-पुन्हा याच कंपनीची निवड करण्याचा दर जास्त आहे, यावरून ग्राहकांचा टाटा एआयए ब्रँडवर असलेला विश्वास दिसून येतो.

टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्सचे अध्यक्ष आणि चीफ फायनान्शियल ऑफिसर श्री समित उपाध्याय यांनी सांगितले, टाटा एआयएमध्ये आम्ही ग्राहकांना केंद्रस्थानी मानून आमची सर्व कामे करत असतो.  आर्थिक कल्याण साध्य करण्यासाठीच्या प्रयत्नांत आमच्या ग्राहकांची साथ देण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो. बोनसची घोषणा पॉलिसीधारकांप्रती आमची वचनबद्धता दर्शवते. टाटा एआयएचे पॉलिसीधारक आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहावेत आणि त्यांच्या निष्ठेसाठी पुरस्कृत केले जावे यासाठी आम्ही सातत्याने अथक मेहनत करत राहू.”

टाटा एआयएने विकसित केलेल्या पीएआर उत्पादनांमध्ये जीवन विमा संरक्षण, उत्पन्न व बोनसच्या रूपाने एकरकमी लाभ यांचा समावेश आहे. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्याने ग्राहकांना मार्केट-लिंक्ड उत्पादनांशी संबंधित जोखीम न घेता आपली गुंतवणूक वाढवण्याची संधी मिळते. रोख बोनसमुळे लिक्विडीटी मिळते व ग्राहकांना पॉलिसीच्या संपूर्ण अवधीमध्ये जीवन संरक्षणाबरोबरीनेच टर्मिनल बोनसमार्फत संपत्ती निर्माण करण्यात मदत मिळते.

टाटा एआयएने निश्चित व अचूक संशोधन प्रक्रिया तयार केली असून आपल्या ग्राहकांना सातत्यपूर्ण मूल्य मिळत राहावे यासाठी दीर्घकालीन दृष्टिकोन बाळगून ही कंपनी आपली वाटचाल करत आहे.  ३१ मार्च २०२३ रोजी कंपनीची एकूण व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता (एयुएम) ७१००६ कोटी रुपये होती. आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सी मॉर्निंगस्टारच्या* माहितीनुसार, याच कालावधीत टाटा एआयए लाईफची ९९.१०% रेटेड एयुएम पाच वर्षांच्या आधारावर एकतर ४-स्टार किंवा ५-स्टार होती.  नवीन व्यवसायासाठी उपलब्ध असलेल्या ११ फंड्सपैकी ७ ना पाच वर्षांच्या आधारावर ५-स्टार व ४ ना ४-स्टार रेटिंग देण्यात आले होते.  

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…