
no images were found
१६०० हून अधिक शाळेतील विद्यार्थी आणि कर्मचारी सदस्यांना प्रत्यक्ष रस्ते सुरक्षा प्रशिक्षण
कोल्हापूर,: सुरक्षित रस्ते आणि जबाबदार वाहन चालविण्याच्या आपल्या उद्देशाला पुढे नेत, होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया (HMSI) ने कोल्हापूर, महाराष्ट्र येथे रस्ता सुरक्षेसंबंधी जनजागृती कार्यक्रम आयोजित केला. या उपक्रमाने इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधील १६०० हून अधिक विद्यार्थी आणि कर्मचारी सदस्यांना एक दिवसासाठी संवादात्मक सत्र आणि प्रत्यक्ष प्रशिक्षणाद्वारे रस्ता सुरक्षेची महत्त्वाची माहिती प्रदान केली.
मी हा उपक्रम HMSI च्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे, ज्याचा उद्देश सहभागींमध्ये सुरक्षा प्रथम असा दृष्टीकोन विकसित करणे आहे. शिक्षण आणि अनुभवाच्या माध्यमातून वर्तनात्मक बदल घडविण्यावर लक्ष केंद्रित करत, या अभियानाने सहभागींची रस्ता सुरक्षेच्या मूलभूत गोष्टींशी सखोल ओळख करून दिली.
मंत्रालयाच्या रस्ता वाहतूक आणि महामार्ग विभागाच्या २०२२ च्या अहवालानुसार, महाराष्ट्रात एकूण ३३,३८३ रस्ते अपघात, १५,२२४ मृत्यू आणि २७,२३९ जखमींची नोंद झाली. ही आकडेवारी केवळ रस्त्यावर निष्काळजीपणाचे धोके अधोरेखित करत नाही, तर विविध भागांमध्ये सक्रिय जनजागृती मोहिमांचे महत्त्व देखील स्पष्ट करते.
कोल्हापूरमधील या उपक्रमाचा उद्देश युवा विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित वाहन चालविण्याच्या सवयींबद्दल जनजागृती निर्माण करणे हा होता. यासाठी संवादात्मक उपक्रमांचा समावेश करण्यात आला होता, ज्यामध्ये सुरक्षित वाहन चालवण्याचा सिद्धांत, हेल्मेट जनजागृती उपक्रम, स्थिर प्रात्यक्षिके, खेळ आणि प्रश्नमंजुषा यांचा समावेश होता.