no images were found
50 पेक्षा अधिक खऱ्या पुजाऱ्यांनी घेतला प्यार का पहला अध्याय
प्यार का पहला नाम राधा मोहन, तेरी मेरी इक जिंदरी आणि रब से है दुआ यासारख्या देशभरातील प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंत केलेल्या मालिकांनंतर ‘झी टीव्ही’ वाहिनी ‘स्टुडिओ एलएसडी प्रॉडक्शन्स’ या संस्थेच्या सहकार्याने ‘प्यार का पहला अध्याय शिव शक्ती’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणणार आहे. मालिकेत शिव आणि शक्तीच्या भूमिका लोकप्रिय कलाकार अनुक्रमे अर्जुन बिजलानी आणि निक्की शर्मा साकारणार असून मालिकेच्या प्रसिध्दीसाठी तयार करण्यात आलेल्या पहिल्या प्रोमोला मोठा प्रेक्षकवर्ग लाभला आहे. आता या मालिकेबद्दलची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
‘प्यार का पहला अध्याय शिव शक्ती’ मालिकेतील एक प्रसंग वास्तवदर्शी वाटण्यासाठी त्याचे केवळ वाराणशी शहरात चित्रीकरण केले असे नव्हे, तर त्यात तब्बल 50 पेक्षा अधिक खर््या पंडितांना (पुजारी) सहभागी करण्यात आले होते. मालिकेचे कथानक वाराणशीमध्ये घडत असल्याने मालिकेचे चित्रीकरण प्रत्यक्ष त्या शहरात करणे सुसंगतच होते. हे शहर ही भारताची आध्यात्मिक राजधानी आहे. अर्जुन आणि निक्की यांनी गंगा घाचटावर या प्रसंगाचे चित्रीकरण केले त्यात खरे पुजारी सहभागी झाले होते. या प्रसंगाच्या चित्रीकरणाचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर प्रसृत झाला असून तो खूपच लोकप्रिय ठरला आहे.
या चित्रीकरणाच्या अनुभवावर अर्जुन बिजलानी म्हणाला, “प्यार का पहला अध्याय शिव शक्तीचा पहिला भाग प्रत्यक्ष वाराणशीत आणि तब्बल 50 पेक्षा अधिक पंडितांसह चित्रीत करण्याचा हा अनुभव स्वप्नवत होता. या भागात खर््या पुजार््यांचा समावेश करण्याचा हेतू हा होता की मालिकेचं कथानक प्रेक्षकांच्या मनावर ठसलं जावं आणि त्यांना या कथानकाचं वास्तववादी दर्शन घडावं. अशा छोट्या छोट्या तपशिलांमुळे आमची मालिका प्रेक्षकांशी जोडली जाईल.”
अर्जुन बिजलानी आणि निक्की शर्मा यांना नव्या रूपात एकत्र भूमिका साकारताना पाहण्याच्या कल्पनेने प्रेक्षकांमध्ये खूप उत्कंठा निर्माण झाली असून शिव आणि शक्ती यांच्या सनातन नात्याला आजच्या संदर्भात पाहणे रंजक ठरेल.