Home Uncategorized तब्बल 6 वर्षांच्या विश्रांतीनंतर अभिनेता कुशाल टंडन चे टीव्हीवर पुनरागमन

तब्बल 6 वर्षांच्या विश्रांतीनंतर अभिनेता कुशाल टंडन चे टीव्हीवर पुनरागमन

11 second read
0
0
27

no images were found

तब्बल 6 वर्षांच्या विश्रांतीनंतर अभिनेता कुशाल टंडन चे टीव्हीवर पुनरागमन

 

कौशल टंडनच्या चाहत्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे कारण त्यांचा हा लाडका अभिनेता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘बरसातें – मौसम प्यार का’ या रोमॅंटिक मालिकेत दिसणार आहे. एका न्यूजरूमच्या वातावरणात जन्म घेणारी ही प्रेम कहाणी रेयांश आणि आराधना या दोन हेकेखोर व्यक्तींमधला संघर्ष दाखवते. ते दोघे भावनांच्या गुंत्यात अडकतात. वादळी पावसाळ्यातल्या रोमान्सवर प्रकाश टाकणाऱ्या, बालाजी टेलिफिल्म्स द्वारा निर्मित या मालिकेत कुशाल टंडन रेयांश लांबाची भूमिका करणार आहे.

मालिकेच्या पहिल्या टीझरने प्रेक्षक अचानक उत्तेजित झाले आहेत. 6 वर्षांनी कुशाल पुन्हा टेलिव्हिजनवर येत असल्याच्या बातमीने सर्व जण रोमांचित झाले आहेत. आजवर आपल्या जबरदस्त लुक्सने आणि अभिनयाने कुशालने अनेकांची हृदये जिंकली आहेत आणि तो रेयांश लांबाची व्यक्तिरेखा जिवंत करणार आहे. रेयांश हा एका वृत्त-वाहिनीचा मालक असून तो खूप महत्त्वाकांक्षी, सभ्य दिसणारा आणि मोहक व्यक्तिमत्त्वाचा तरुण आहे. आणि ‘इतरांचे मन मोडणारा’ असा लौकिक असणाऱ्या रेयांशसारख्या मुलांच्या प्रेमात मुली हमखास पडत असतात.

रेयांशच्या व्यक्तिरेखेतून ‘बरसातें – मौसम प्यार का’ मालिकेत पुनरागमन करत असल्याबद्दल कुशाल टंडन म्हणतो, “टेलिव्हिजन हे माझे प्रेम होते आणि नेहमीच राहील. दोन अगदी वेगळ्या व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्तींमधील रोमान्स दाखवणाऱ्या बरसातें – मौसम प्यार का या मालिकेद्वारे पुनरागमन करताना मला खूप छान वाटते आहे. या मालिकेत त्या दोघांच्या आकांक्षांचा संघर्ष आणि त्यातून येणारे भावनांचे वादळ यांचे चित्रण असेल. मला पहिल्यापासून अशा इतरांहून वेगळ्या उठून दिसणाऱ्या भूमिका आवडतात, अर्थात त्या पटणाऱ्या असल्या पाहिजेत. रेयांश ही व्यक्तिरेखा अगदी मला हवी तशीच आहे, त्यामुळे मी या मालिकेत काम करण्यास होकार दिला. त्याच्या रूपाची मोहकता, आकर्षण आणि वागण्यात दिसणारा सुसंस्कृतपणा यावर मुली भाळतात आणि सामाजिक रिती-रिवाजांना तो दाद देत नाही. तो एका न्यूज चॅनलचा मालक आहे आणि काम कशा पद्धतीने व्हायला हवे याबाबत त्याचा दृष्टिकोन अगदी वेगळा आहे. त्यामुळे कधी कधी तो उद्दाम वाटतो. त्याच्यात भावनांचा ओलावा नाही, त्यामुळे स्त्रीविषयीचे सौजन्य त्याच्याकडे नाही. मालिकेच्या घट्ट विणलेल्या कथानकात रेयांश आणि आराधना यांचे मार्ग एकमेकांना छेदताना दिसतील आणि सुरुवातीला एकमेकांबद्दल वाटणारे शत्रुत्व जाऊन हळूहळू त्याचे प्रेमात रूपांतर कसे होईल, हे बघायला नक्की मजा येईल.”

तो पुढे म्हणतो, “एकता मॅमविषयी माझ्या मनात नितांत आदर आहे. जेव्हा त्यांनी या मालिकेच्या संदर्भात माझ्याशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी मला सांगितले की, मला नजरेसमोर ठेवूनच ही व्यक्तिरेखा उभी करण्यात आली आहे. त्यामुळे रेयांशमध्ये थोडासा कुशाल देखील आहे. पडद्यावर रेयांश मुलींचे मन मोडणारा असला तरी प्रेक्षकांचे मन मात्र तो नक्की जिंकून घेईल अशी मला खात्री आहे आणि या प्रवासासाठी मी आतुर झालो आहे.”

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…