Home मनोरंजन  ‘मॅडम सर’ मालिकेत करिष्‍मा सिंग चिंगारी गँगमध्‍ये जाणार ???

 ‘मॅडम सर’ मालिकेत करिष्‍मा सिंग चिंगारी गँगमध्‍ये जाणार ???

56 second read
0
0
97

no images were found

 ‘मॅडम सर’ मालिकेत करिष्‍मा सिंग चिंगारी गँगमध्‍ये जाणार ???

सोनी सबवरील लोकप्रिय पोलिससंबंधित मालिका साप्‍ताहिक ड्रामा, मनोरंजन, तसेच रोमांचक घटनांसह प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. नुकतेच कथानकामध्‍ये लक्षणीय ट्विस्‍ट येणार आहे, जेथे करिष्‍मा चिंगारी गँगमध्‍ये सामील होण्‍याचा निर्णय घेते.

प्रेक्षकांना पाहायला मिळेल की आगामी एपिसोड्समध्‍ये हसीनाची खाला एमपीटीमध्‍ये एफआयआर दाखल करते, पण या केसमुळे हसीना गंभीर संकटात सापडेल. मीडिया डीएसपीला विचारते की, एमपीटीला वाचवण्‍यसाठी हसीनाने ही काल्‍पनिक एफआयआर केली आहे का? करिष्‍मा शिवानी ताईला भेटते आणि चिंगारी गँगमध्‍ये सामील होण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त करते, तर डीएसपी या सर्व गोंधळाचा दोष हसीनाला देतो. चिंगारी गँगमध्‍ये सामील होण्‍यासाठी करिष्‍माला निष्‍ठतेची चाचणी पार करावली लागेल आणि या चाचणीचा भाग म्‍हणून ती सल्‍ला देते की, हसीनाच्‍या खालाने गँगकडून मदत घेतली पाहिजे.

करिष्‍माची खरंच चिंगारी गँगमध्‍ये सामील होण्‍याची इच्‍छा आहे का?

एसआय करिष्‍मा सिंगची भूमिका साकारणारी युक्‍ती कपूर म्‍हणाली, “करिष्‍मा धडाकेबाज पोलिस अधिकारी आहे, पण एमपीटीमध्‍ये कोणत्याच केसेस येत नाहीत. करिष्‍माची विचारसरणी अगदी चिंगारी गँगसारखी असते आणि त्‍यांना अधिक केसेसचे निराकरण करण्‍याची गरज असते. म्‍हणूनच करिष्‍मा चिंगारी गँगमध्‍ये सामील होण्‍याचे ठरवते. पण ती एमपीटी सोडून चिंगारी गँगमध्‍ये प्रवेश करेल का? याबाबत प्रेक्षकांना लवकरच उलगडा होईल.’’

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …