
no images were found
शाळा बंद निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांचे ‘दप्तर घ्या, बकऱ्या द्या’ आक्रोश आंदोलन
नाशिक : राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णया संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले असून त्याच्या अंमलबजावणीला देखील सुरुवात झाली आहे. असे असले तरी या निर्णयाविरोधात पालक-विद्यार्थ्यांकडून निषेध नोंदविला जात आहे. याचाच एक भाग म्हणून नाशिकच्या जिल्हा परिषदेत झालेल्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतल आहे. हे आंदोलन कुठल्या कामगार युनियन किंवा संघटनेचे नसून हे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे होतं.
हे आंदोलन विद्यार्थ्यांनी हक्काचं शिक्षण मिळावं यासाठी करण्यात आलं आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात असलेल्या दरेवाडी या अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन पुकारले आहे. दरेवाडीतील जिल्हा परिषदेच्या या शाळेत ४० ते ५० विद्यार्थी शिकत होते. शाळा बंद केल्याने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होत आहे. शासनाच्या निर्णयाविरोधात दरेवाडी गावातील विद्यार्थ्यांनी नाशिक जिल्हापरिषद समोर दप्तर घ्या, बकऱ्या द्या आंदोलन करण्यात केले. बंद झालेली शाळा सुरू करण्याच्या मागणीसाठी इगतपुरीतील दरेवाडी गावातील विद्यार्थ्यांनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
शाळा बंद केल्याने या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे बकरी घेऊन विद्यार्थ्यांचा मोर्चा जिल्हा परिषद कार्यालयावर धडकला. या विद्यार्थ्यांनी थेट नाशिक जिल्हा परिषदेसमोर ‘दप्तर घ्या बकऱ्या द्या, आंदोलन छेडलंय. आमची शाळा बंद केल्याने आता बकऱ्या चारण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरला नाहीये. त्यामुळे आता काहीच कामाचे न राहिलेले आमचे दप्तर जिल्हा परिषदेला जमा करून त्यांच्याकडून बकऱ्या घेण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषद भवनावर आक्रोश मोर्चा नेत अनोखे आंदोलन छेडले.