
no images were found
थरारक पाठलाग करून कस्टमने पकडलेल्या बोटीत डिझेलचा साठा
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात दाभोळ बंदरामध्ये डिझेलची तस्करी करणारी सोन्याची जेजुरी नावाची बोट जप्त करण्यात आली आहे. या बोटीवरील तब्बल ४० हजार लिटर इतका डिझेलचा साठा कस्टम विभागाने जप्त केला.
दाभोळ ते गुहागर दरम्यान १० फेब्रुवारी२०२३ रोजी सायं. ५ च्या दरम्यान डिझेल तस्करी करणार्या सोन्याची जेजुरी बोटीवर रत्नागिरी कस्टम विभागाच्यावतीने कारवाई करण्यात आली होती. बोटीतील १७ कंपार्टमेंटमधील 2 कंपार्टमेंट रिकामे होते. उर्वरित १५ कंपार्टमेंटमध्ये डिझेलचा साठा आढळून आला होता. दरम्यान या बोटीवर तब्बल ४० हजार लिटर इतका डिझेलचा साठा कस्टमने जप्त केला होता.
ही बोट नांगर टाकून दाभोळ बंदरात उभी ठेवण्यात आल्याने धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तरीही डिझेल साठ्याच्या मुळाशी जावून कस्टम विभाग शोध घेत असून आंतरराष्ट्रीय तस्करांच्या टोळीचे धागेदोरे हाती लागले असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र हा साठा पाठवणारा अथवा हस्तांतरित करणारा कोण आहे याचा शोध आता रत्नागिरी कस्टम विभागाच्यावतीने घेण्यात येत आहे. दरम्यान ही बोट रेवस या ठिकाणाहून आली असल्याची माहिती कस्टम विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. त्यामुळे रेवसपासून देखील कस्टम कसून तपास करत आहेत.