no images were found
पालघर साधू हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे
पालघर : येथील साधू हत्याकांड या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून कोणत्याही प्रकारची हरकत नसल्याचे शिंदे सरकारने न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. प्रकरण सीबीआयकडे देण्यास महाराष्ट्र सरकारनं मान्यता दिली आहे. याबाबत राज्य सरकारकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे.
पालघरमधील ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी कोरोनाने थैमान घातले होते. त्यामुळ राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला होता. मविआ काळात घडलेल्या या घटनेचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी भाजपकडून वेळोवेळी केली जात होती. अखेर सत्तातरानंतर या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपविला जाणार आहे.
16 एप्रिल 2020 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सुशीलगिरी महाराज (35) आणि कल्पवृक्ष गिरी महाराज (70) आणि चालक नीलेश तेलगडे (30) हे देशव्यापी कोरोना लॉकडाऊन दरम्यान कारमध्ये बसून कांदिवलीहून सुरत येथे अंत्यसंस्कारासाठी निघाले होते. त्यावेळी गडचिंचिल गावात जमावाने या साधूंना चोर समजून बेदम मारहाण केली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
प्रारंभी या प्रकरणाचा तपास पालघर पोलीस करत होते. त्यानंतर हे प्रकरण राज्य सीआयडी-गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. दरम्यान, महाराष्ट्र सरकारच्या तपासावर शंका उपस्थित करत साधूंनी आणि संबंधित साधूंच्या कुटुंबियांना या प्रकरणाची सीबीआय आणि एनआयए चौकशीची मागणी केली होती.