
no images were found
अमिताभ बच्चन यांचा आज 80 वा वाढदिवस
मुंबई : बॉलिवूडचे लाडके ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. बिग बी आपला वाढदिवस आज मुंबईतच साजरा करणार आहेत. अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याबाहेर रात्रीपासूनच चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. चाहत्यांनी अनेकप्रकारे त्यांना शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत. या गर्दीमध्ये उत्साह असून चाहते वेगवेगळे पोस्टर घेऊन अमिताभ यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या जुहू येथील बंगल्याबाहेर दाखल झाले आहेत. काहींनी तर वैशिष्ट्यपूर्ण डान्स करून शुभेच्छा व्यक्त केल्या. परदेशातील चाह्त्यांचाही यात समावेश आहे.