Home क्राईम सुरक्षेच्या कारणास्तव कार्यरत असलेल्या  जवाना कडून ४ जणांचा मृत्यू

सुरक्षेच्या कारणास्तव कार्यरत असलेल्या  जवाना कडून ४ जणांचा मृत्यू

2 second read
0
0
25

no images were found

सुरक्षेच्या कारणास्तव कार्यरत असलेल्या  जवाना कडून ४ जणांचा मृत्यू

मुंबई : जयपूर ते मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये गोळीबार झाल्याची एक धक्कादायक घटना घडली आहे.  सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली.आरपीएफ जवानाकडून हा गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात ४ जणांचा मृत्यू झाला आहे.या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार मनिषा चौधरी बोरिवली रेल्वे स्थानकात दाखल झाल्या

मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर-मुंबई ( गाडी क्र. १२९५६ ) ही सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेस मुंबई सेंट्रलकडे जात असताना सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गाडीत सुरक्षेच्या कारणास्तव कार्यरत असलेला आरपीएफ जवान चेतन कुमार याने एएसआय टिकाराम मीना यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात टिकाराम यांच्यासह अन्य तीन जणांचा मृत्यू झाला आहे.गोळीबार केल्यानंतर बोरिवली स्थानकापूर्वी गाडीचा वेग मंदावल्यानंतर आरपीएफ जवान चेतन गाडीमधून उडी टाकून फरार झाला होता.

यानंतर ही गाडी मुंबई  सेंट्रल स्थानकात पोहोचली असून, ४ जणांचे मृतदेह शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं की, “आरपीएफ जवानाने गोळीबार केल्याची माहिती सकाळी ६ वाजता आम्हाला मिळाली या घटनेनंतर आमचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. मृतांच्या कुटुंबीयांशी संपर्क करण्यात येत आहे.”फरार आरोपी आरपीएफ जवान चेतनला भाईंदरमध्ये अटक करण्यात आली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

गुरव’ यांच्या बालकाव्य  संग्रहास राज्यस्तर पुरस्कार.     

गुरव’ यांच्या बालकाव्य  संग्रहास राज्यस्तर पुरस्कार.       …