Home राजकीय इचलकरजीत कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वाढता पाठिंबा; प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या भेटीगाठींमुळे उत्साहाचे वातावरण

इचलकरजीत कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वाढता पाठिंबा; प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या भेटीगाठींमुळे उत्साहाचे वातावरण

0 second read
0
0
9

no images were found

इचलकरजीत कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वाढता पाठिंबा; प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या भेटीगाठींमुळे उत्साहाचे वातावरण

इचलकरंजी: पुणे विभाग शिक्षक विधान परिषद निवडणुकीतील भाजप महायुतीचे उमेदवार ‘शिक्षकमित्र’ कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या प्रचारार्थ इचलकरंजी शहर आणि परिसरात जोरदार मोहीम राबविण्यात येत आहे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी इचलकरंजीतील विविध शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रत्यक्ष भेटी घेत कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी सहकार्याचे आवाहन केले आहे. या दौऱ्यात डीकेटीईचे संचालक सुनील पाटील आणि प्रा. शेखर शहा यांचीही विशेष उपस्थिती होती.

या संवादादरम्यान मान्यवरांनी कौस्तुभ गावडे यांचे नेतृत्व, कार्यक्षमता आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची प्रशंसा करत त्यांना पूर्ण सहकार्य करण्याची सकारात्मक भूमिका दर्शवली. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची जाण असणारे आणि त्यांच्या अडचणी सोडवणारे सक्षम प्रतिनिधित्व विधान परिषदेत जाणे गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या या व्यापक संपर्कामुळे इचलकरंजीतील प्रचाराला नवी ऊर्जा मिळाली असून, शिक्षक वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रचार मोहिमेदरम्यान प्राचार्य साळुंखे यांनी शहरातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांना भेटी देऊन संस्थाचालक, शिक्षक व मान्यवरांशी संवाद साधला. यामध्ये प्रामुख्याने माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे, माजी आमदार अशोकराव जांभळे, माजी मंत्री जयवंतराव आवळे, माजी आमदार राजूबाबा आवळे, कृष्णाजी व श्रीनिवासजी बोहरा (ना. बा. एज्युकेशन सोसायटी), कौशिक मराठे (व्यंकटराव हायस्कूल), धोंडीराम कस्तुरे (तात्यासाहेब विद्यालय), अहमद मुजावर (नॅशनल हायस्कूल), प्रा. ए. आर. तांबे (श्रद्धा परिवार), अरुण व राहुल खंजिरे (खंजिरे शिक्षण समूह), अमरसिंह माने (सरस्वती हायस्कूल) आणि गणेश नायकवडे (गुरुकुल संस्था) यांच्यासह अनेक दिग्गज व्यक्तींची भेट घेण्यात आली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

हस्तिनापुर के वीर मालिकेच्या आगामी ट्रॅकबद्दल व्यंकटेश पांडे म्हणाले.  

हस्तिनापुर के वीर मालिकेच्या आगामी ट्रॅकबद्दल व्यंकटेश पांडे म्हणाले.      …