Home Uncategorized मंगळवेढ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला बळ; विजयासाठी बूथनिहाय नियोजन

मंगळवेढ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला बळ; विजयासाठी बूथनिहाय नियोजन

2 second read
0
0
11

no images were found

मंगळवेढ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला बळ; विजयासाठी बूथनिहाय नियोजन

आमदार समाधान आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक संस्था चालक, मुख्याध्यापक व शिक्षकांचा संवाद मेळावा उत्साहात संपन्न

मंगळवेढा : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा येथे आमदार समाधानदादा आवताडे यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली तालुक्यातील शैक्षणिक संस्था चालक, मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा संवाद मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात कौस्तुभ गावडे यांना प्रथम पसंतीचे मत देऊन विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी बूथनिहाय नियोजनावर भर देण्यात आला.

     यावेळी भारतीय जनता पक्षाचे मंगळवेढा तालुका पक्ष निरीक्षक तथा धुळे जिल्ह्यातील माजी आमदार कुणाल पाटील यांनी आपल्या मनोगतात कौस्तुभ गावडे यांना प्रथम पसंतीचे मत देण्याचे आवाहन केले. शिक्षकांचे प्रश्न समजून घेणारे आणि शिक्षण क्षेत्राशी निगडित समस्यांची जाण असणारे नेतृत्व विधान परिषदेत पाठविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

आमदार समाधानदादा आवताडे यांनी निवडणुकीच्या दृष्टीने बूथनिहाय सूक्ष्म नियोजन करण्यावर भर दिला. प्रत्येक बूथप्रमुखाकडे मतदारांची जबाबदारी निश्चित करणे, क्लस्टरप्रमुखांच्या समन्वयातून मतदारांपर्यंत पोहोचणे आणि मतदानाच्या दिवशी प्रत्येक बूथवर जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी नियोजन करणे, याबाबत त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. मतदारांशी सातत्यपूर्ण संपर्क ठेवून मतदानाच्या दिवशी त्यांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी यंत्रणा सक्रिय करण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले.

या संवाद मेळाव्यात मंगळवेढा तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, संस्था चालक, मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी कौस्तुभ गावडे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शविला. त्यांना प्रथम पसंतीचे मत देऊन विजयी करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विभागप्रमुख जयप्रकाश पाटील तसेच बोराळे येथील कवचाळे सर यांनी मनोगत व्यक्त करत कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने आपली भूमिका मांडली. शिक्षकांचे प्रश्न, शैक्षणिक क्षेत्रातील आव्हाने आणि शिक्षकांना सक्षम प्रतिनिधित्व मिळण्याचे महत्त्व यावर यावेळी विचार व्यक्त करण्यात आले.

या मेळाव्यास भाजपचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष, पक्षाचे विविध पदाधिकारी, शिक्षक आघाडीचे नेते तसेच तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. संवाद, संघटन आणि बूथनिहाय नियोजनाच्या माध्यमातून कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला मंगळवेढा तालुक्यात बळ देण्याचा निर्धार या मेळाव्यातून व्यक्त झाला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

हस्तिनापुर के वीर मालिकेच्या आगामी ट्रॅकबद्दल व्यंकटेश पांडे म्हणाले.  

हस्तिनापुर के वीर मालिकेच्या आगामी ट्रॅकबद्दल व्यंकटेश पांडे म्हणाले.      …