Home राजकीय साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका

2 second read
0
0
9

no images were found

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला

सातारा :  पुणे विभाग शिक्षक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीचे उमेदवार शिक्षकमित्र श्री. कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या प्रचारार्थ श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या आजीव सेवक डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात विविध शैक्षणिक संस्थांना सदिच्छा भेटी देत प्रचारमोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधून श्री. कौस्तुभ गावडे यांना प्रथम पसंतीचे मत देण्याचे आवाहन करण्यात आले.

या प्रचार मोहिमेत सातारा जिल्हाप्रमुख श्री. शशिकांत काटे, सह-जिल्हा विभागप्रमुख प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड, सिनिअर विभाग प्रचारप्रमुख डॉ. दीपक जाधव, प्रा. संदीप भुजबळ, श्री. विवेकानंद केशरकर आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. 

विविध शैक्षणिक संकुलांना भेटी देत शिक्षक मतदारांशी संपर्क साधण्यावर आणि उमेदवाराच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची माहिती पोहोचविण्यावर भर देण्यात आला.

प्रचारादरम्यान यशोदा कॅम्पस येथे श्री. दशरथ सगरे यांची वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी प्राचार्या डॉ. श्रुती जोशी यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच श्री. कौस्तुभ गावडे यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची माहिती देत त्यांना निवडणुकीत प्रथम पसंतीचे मत देण्याचे आवाहन केले.

त्यानंतर गौरीशंकर कॅम्पस येथे संस्थेचे सचिव श्री. मुडलगीकर आणि श्री. श्रीरंग काटिकर यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. या भेटीच्या निमित्ताने शैक्षणिक क्षेत्रातील विविध विषयांवर संवाद साधण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. मदनराव जगताप आणि उपाध्यक्ष मा. दिलीप जगताप यांच्या वतीने शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला.

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना सातारा जिल्ह्यातील या संपर्क मोहिमेमुळे प्रचाराला गती मिळाली. शैक्षणिक संस्थांमधील पदाधिकारी, शिक्षक आणि मान्यवरांशी संवाद साधत शिक्षकांचे प्रश्न, शैक्षणिक क्षेत्रातील आव्हाने आणि सक्षम शिक्षक प्रतिनिधित्वाची गरज यांविषयी भूमिका मांडण्यात आली.

प्राचार्या डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी भेटी देत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. या मोहिमेतून शिक्षकांशी थेट संवाद साधण्याबरोबरच कौस्तुभ गावडे यांच्या उमेदवारीला पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

सातारा जिल्ह्यातील या सदिच्छा भेटी आणि प्रचार संपर्क मोहिमेमुळे निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, श्री. कौस्तुभ गावडे यांना प्रथम पसंतीचे मत देण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

क्षयरोगाचे प्रसारमार्ग, लवकर निदान व मोफत उपचारांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती

क्षयरोगाचे प्रसारमार्ग, लवकर निदान व मोफत उपचारांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती : नवरात्…