Home Uncategorized अल-निनोच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शेतीसाठी पाणी उपसाबंदी जाहीर

अल-निनोच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शेतीसाठी पाणी उपसाबंदी जाहीर

7 second read
0
0
10

no images were found

अल-निनोच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शेतीसाठी पाणी उपसाबंदी जाहीर

Oplus_131072

 कोल्हापूर,  : भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यावर्षी अल-निनो परिस्थितीचा प्रभाव राहण्याची शक्यता असल्याने पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यातील धरणांतील उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी वापरण्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे. या अनुषंगाने कोल्हापूर पाटबंधारे विभाग उत्तरच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी कोल्हापूर, पंचगंगा, भोगावती, दूधगंगा, वारणा, तुळशी, कासारी, कडवी, कुंभी, धामणी जांभळी या नद्यांच्या दोन्ही तीरावरील भागात शेतीसाठी पाणी उपसा करणा-या उपसा यंत्रावर 15 जून पासून पुढील आदेशापर्यंत उपसाबंदी जाहीर केली आहे.

      उपसाबंदी कालावधीत अनाधिकृत उपसा आढळून आल्यास, संबंधित उपसायंत्र जप्त करून परवाना धारकाचा उपसा परवाना एक वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येईल व होणा-या नुकसानीस पाटबंधारे खाते जबाबदार होणार नाही. हा आदेश महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976, कलम 51 (3) व 97 मधील तरतूदीनुसार असलेल्या अधिकारान्वये देण्यात आला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

दिव्यांग शाळांमध्ये पहिला दिवस उत्साहात साजरा विद्यार्थ्यांना भोजन आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप

दिव्यांग शाळांमध्ये पहिला दिवस उत्साहात साजरा विद्यार्थ्यांना भोजन आणि शैक्षणिक साहित्याचे…